ETV Bharat / state

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची राजकीय कारकीर्द औट घटकेची? राजकीय वर्तुळात रंगलीय चर्चा - Urmila Matondkar

Urmila Matondkar : बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना लहानपणापासून समाजवादी विचारांचे बाळकडू मिळाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर सध्या काय करत आहेत? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Urmila Matondkar
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 6:54 PM IST

मुंबई Urmila Matondkar : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या राजकीय पटलावरून गायब आहे. आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर सध्या काय करत आहेत? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यामुळं उर्मिला मातोंडकर यांची राजकीय कारकीर्द औट घटकेची ठरल्याची चर्चा आहे. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. जुदाई, रंगीला, एक हसीना थी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिकांना रसिकांनी चांगलीच पसंती दिली होती. उर्मिला मातोंडकर यांना अभिनयासोबतच त्यांच्या घरातूनच सामाजिक कार्याचं आणि राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं.

उर्मिला मातोंडकर यांची सामाजिक पार्श्वभूमी : उर्मिला मातोंडकर यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे कामगार नेते होते. तसंच ते समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रसेवा दल या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळं उर्मिला मातोंडकर यांनीही आपल्यावर समाजवादी विचारांचा पगडा असल्याचं आणि राष्ट्रसेवा दलाचे संस्कार असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यामुळंच उर्मिला मातोंडकर यांनी आपला मोर्चा राजकारणाकडं वळवला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या काँग्रेसकडून रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी शिफारस करण्यात आली. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्यामुळं उर्मिला मातोंडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.

प्रतिक्रिया देताना मनिषा कायंदे (ETV Bharat Reporter)

उर्मिला अन् कंगना वाद : कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. कंगना राणौत यांच्या टीकेला आणि आरोपांना बॉलीवूडमधून जर कोणी प्रत्युत्तर दिलं असेल तर त्या म्हणजे उर्मिला मातोंडकर आहे. उर्मिला आणि कंगना यांच्यात काही काळ ट्विटर युद्ध सुरू राहिलं. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एक दोन कार्यक्रम वगळता उर्मिला मातोंडकर या राजकारणातून नाहीशा झाल्या आहेत.

उर्मिला मातोंडकर म्हणतात, नो कॉमेंट्स : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र, या 12 जागांची नियुक्ती अजूनही झालेली नाही. त्यामुळं उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेच्या सदस्य पदाची संधी लाभली नाही. परिणामी उर्मिला मातोंडकर या राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या नाहीत आणि ट्विटरच्या माध्यमातूनही त्या आता व्यक्त होत नाहीत. यामागचं कारण काय? आणि आपण अजूनही शिवसेनेत आहात का? असं विचारलं असता उर्मिला मातोंडकर यांनी फक्त नो कॉमेंट्स एवढेच त्रोटक उत्तर दिलं. उर्मिला मातोंडकर यांच्या या उत्तरामुळं त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत आणि त्यांच्या आगामी राजकीय दिशेबाबत सांगता येणं अवघड आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची पक्षाने विधान परिषदेच्या जागेसाठी शिफारस केली होती का? त्यांचं नाव कसं आणि कोणी सुचवलं होतं? आणि सध्या त्या पक्षात कार्यरत आहेत किंवा नाही? याबाबत आपल्याला नेमकी माहिती नाही. तसेच त्याच्या पक्षातील कार्याबाबत पक्षाची नेमकी काय भूमिका आहे याची देखील आता आपल्याला माहिती नाही. त्यामुळं या विषयावर आपण बोलणार नाही. - सुषमा अंधारे शिवसेनेच्या प्रमुख नेत्या

मातोंडकरांचा पत्ता उद्धव ठाकरेंना माहीत - कायंदे : या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, उर्मिला मातोंडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता नेमक्या त्या कुठे आहेत आणि काय करत आहेत याची आपल्याला माहिती नाही. त्या एकेकाळी आमच्यासोबत पक्षात होत्या हे जरी खरे असले तरी, आता आम्ही शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळं त्या कुठे आहेत हे केवळ उद्धव ठाकरेच सांगू शकतात.

हेही वाचा -

  1. महायुतीत भाजपाकडून शिवसेनेची कोंडी? आमदार मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगत विषय संपवला - MANISHA KAYANDE EXCLUSIVE INTERVIEW
  2. Manisha Kayande On Supriya Sule : सुळे, आव्हाडांचा ड्रग्ज तस्करांशी संबंध? मनिषा कायंदे म्हणाल्या उत्तर द्या!
  3. Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणतात, 'भाजप हिटलरच्या वाटेवर, देश वाचवण्यासाठी..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.