मुंबई - Hrithik Roshan: 'फायटर'नंतर आता हृतिक रोशन 'वॉर 2' चित्रपटात दिसणार आहे. 'वॉर 2' चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. हृतिकनं मार्च 2024 मध्ये आणि ज्युनियर एनटीआरनं एप्रिल 2024 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. 'वॉर 2'चं दिग्दर्शन अयान मुखर्जी करीत आहेत. दरम्यान, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी या चित्रपटासाठी इटलीमध्ये एका रोमँटिक गाण्याचं शूटिंग करीत आहेत. आता शूटिंग सेटवरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
#HrithikRoshan aka Kabir #War2 shooting in Italy 🔥🥹🥹
— 😎 (@ihrithikswagg) September 18, 2024
The energy and swagg. pic.twitter.com/F45f92RTwj
BTS - #WAR2 shooting at Siena, Italy. #HrithikRoshan #KiaraAdvani #YRF pic.twitter.com/jRXvqP31vZ
— Cool Fan Club of H.RO (@CoolFanClubofHR) September 18, 2024
Straight from the sets
— Aish HR (@AishFighter) September 18, 2024
GreekGod raising the temperature 🔥#HrithikRoshan #War2pic.twitter.com/0JiGdbmcCd
गाणं किती दिवसांत शूट होणार? : रिपोर्ट्सनुसार, 18 सप्टेंबरला हृतिक आणि कियारा 'वॉर 2'च्या रोमँटिक गाण्यांसाठी इटलीला रवाना झाले होते. याआधी 'वॉर' चित्रपटातील घुंगरू हे गाणंदेखील इटलीच्या अमाल्फी कोस्टच्या पोस्टिनो बीचवर शूट करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा आणि अयान मुखर्जी हे व्हेनिस आणि लेक कोमोजवळ गाण्याचं शूटिंग करत आहेत. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि अयान मुखर्जीसह चित्रपटाची टीम दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रोमँटिक गाण्याचं शूट 18 सप्टेंबरपासून सुरू झालं आहे. या चित्रपटाचं शूटिंग इटलीमध्ये 15 दिवस चालणार आहे. अयान पहिल्या सहा दिवसांत गाणं शूट करणार आहे. हे रोमँटिक गाणं प्रीतमनं संगीतबद्ध केलं आहे. इटलीमध्ये अनेक ॲक्शन सीन्सदेखील शूट केले जाणार आहेत, यानंतर टीम भारतात परतेल. हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.
On sets of #WAR2
— Anand Abhirup 📌 🧡 🦩 (@SanskariGuruji) September 18, 2024
Kabir Mode on 🔥 #HrithikRoshan pic.twitter.com/ViewVE3hVm
#HrithikRoshan in Itlay for #War2 pic.twitter.com/suV9evr5Zt
— A N K I T (@Ankitaker) September 18, 2024
चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'वॉर 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात हृतिक कबीर धालीवाल (रॉ एजंट) च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षी संपणार आहे. 'वॉर 2' चित्रपटामध्ये हृतिक, एनटीआर आणि कियारा व्यतिरिक्त जॉन अब्राहम, शब्बीर अहलुवालिया हेदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. आता हृतिकचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
- हृतिक रोशननं गर्लफ्रेंड सबा आझादबरोबर बाप्पाची केली आरती, ब्रेकअपच्या अफवांना लागला पूर्णविराम - HRITHIK and Saba video viral
- श्रद्धा कपूर आता हृतिक रोशनच्या घरची भाडेकरु , 'खिलाडी' आणि 'स्त्री' नवे शेजारी - shraddhas neighbour akshay kumar
- हृतिक रोशन आणि सबा आझादनं घेतला फिल्म डेटिंगचा आनंद, घातला ब्रेकअपच्या अटकळींना आळा - Hrithik Roshan and Saba Azad