गयाना 124 Meter Six : आयपीएलनंतर जर सर्वात स्फोटक फलंदाजी कोणत्याही लीगमध्ये पाहायला मिळत असेल तर ती नक्कीच कॅरेबियन प्रीमियर लीग आहे. असंच काहीसं CPL 2024 मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. या लीगमध्ये पुन्हा एकदा क्लास आणि पॉवर हिटिंगचा अप्रतिम संगम दिसून येत आहे. CPL 2024 च्या 19 व्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सविरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्सचा फलंदाज शक्केरे पॅरिसनं असा एक फटका मारला की, सारं क्रिकेट जग थक्क झालं. या 21 वर्षीय खेळाडूनं 124 मीटर लांब षटकार मारला, जो क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात लांब षटकार आहे.
124 metres!!! You have to be joking Shaqkere Parris🤯#CPL #TKRvGAW #BiggestPartyInSport #CricketPlayedLouder #CaribbeanAirlines @iflycaribbean pic.twitter.com/ev72KN13H7
— CPL T20 (@CPL) September 19, 2024
शकेरे पॅरिसचा 124 मीटर लांब षटकार : गयानाचा डावखुरा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोटीच्या चेंडूवर शकेरे पॅरिसनं हा षटकार ठोकला. त्यानं मोटीचा उडणारा चेंडू मिड-विकेटवर मारला. हा शॉट इतका चांगला लागला गेला की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. मोठी गोष्ट म्हणजे सीपीएलमधील हा सर्वात लांब षटकार आहे, जरी क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार अजूनही दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ॲल्बी मॉर्केलच्या नावावर आहे.
शककेरे पॅरिस एक मीटरनं इतिहास रचण्यास हुकला : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकारांबद्दल बोलायचं झालं तर, अल्बी मॉर्केल या बाबतीत आघाडीवर आहे. त्यानं 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 125 मीटर लांब षटकार ठोकला होता. आता या यादीत शकरे पॅरिसचं नावही जोडलं गेलं आहे. त्याच्याशिवाय प्रवीण कुमारनंही 124 मीटर लांब षटकार मारला आहे. तर ॲडम गिलख्रिस्टच्या नावावर 122 मीटर लांब सिक्स आहे.
शककेरे पॅरिसचा संघ विजयी : शकेरे पॅरिसनं 124 मीटरचा लांब षटकार तर मारलाच पण त्याचा संघ त्रिनबागो नाइट रायडर्सनं विजयही मिळवला. संघासमोर 149 धावांचं लक्ष्य होतं. आंद्रे रसेलनं 36 धावा आणि टीम डेव्हिडनं 29 धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा :