महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाकिस्तानविरुद्ध झळकावलं त्रिशतक, 'साहेबां'चा खेळाडू झाला करोडपती; कोणत्या संघानं किती रुपयांत केलं खरेदी? - HARRY BROOK SOLD TO DC

आयपीएल 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया इथं आज आणि उद्या होत आहे. यात अनेक खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

Harry Brook Sold to DC
इंग्लंड क्रिकेट संघ (AFP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 24, 2024, 7:27 PM IST

जेद्दाह Harry Brook Sold to DC :आयपीएल 2025 साठी सध्या मेगा लिलाव सुरु आहे. सुरुवातीला 12 मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यावेळी मार्की खेळाडूंच्या यादीत सात भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहेत, त्यांनी गेल्या काही वर्षांत T20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसंच यानंतर अन्य खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यातील अनेक खेळाडू मालामाल झाले तर असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना अपेक्षेप्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. या लिलावात इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सनं 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. त्याची मुळ किंमत 2 कोटी रुपये होती.

दुखापतीमुळं घेतली माघार : हॅरी ब्रूक दुखापतीमुळं आयपीएल 2024 मध्ये खेळला नव्हता. मात्र, त्याला लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं विकत घेतलं आहे. पुन्हा एकदा त्यानं लिलावात आपलं नाव नोंदवलं होतं आणि त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती. दिल्लीनं पुन्हा एकदा या खेळाडूवर विश्वास दाखवला आहे. दिल्लीनं हा स्फोटक फलंदाज इंग्लंडकडून 6.25 कोटी रुपयांना घेतला आहे.

पाकिस्तानविरुद्ध झळकावलं होतं त्रिशतक : आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकनं मागील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटीत शतक झळकावत विश्वविक्रम केला होता. त्यानं मुलतान इथं झालेल्या कसोटी सामन्यात 322 चेंडूत 317 धावा केल्या होत्या. यासह त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं वेगवान त्रिशतक झळकावलं होतं. तसंच इंग्लंडकडून त्रिशतक झळकावणारा तो सहावा फलंदाज ठरला होता. आता त्याला दिल्लीनं आपल्या संघात शामिल केलं आहे. तो कर्णधारपदाचाही प्रबळ दावेदार असू शकतो.

5 खेळाडूंवर 100 कोटी खर्च : ऋषभ पंतला 27 कोटींना लखनऊनं विकत घेतलं. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतलं. या लीगच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटींना विकत घेतलं. पंजाबने अर्शदीपला आरटीएमखाली घेतलं. तसंच लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही 18 कोटींना विकत घेतलं. तर इंग्लंडच्या जोस बटलरला गुजरात टायटन्सनं विकत घेतले. त्याला 15.75 कोटी रुपये मिळाले. बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. या सर्व खेळाडूंची एकूण किंमत 100 कोटींहून अधिक आहे.

हेही वाचा :

  1. IPL Auction 2025: गुजरात टायटन्सनं पोलीस उपअधीक्षकाला घेतलं संघात; किती रुपये मोजले?
  2. 27 सेकंदात ऋषभ पंतनं कमावले 270000000 रुपये... पाच मिनिटांपूर्वी झालेला विक्रम मोडत घडवला इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details