महाराष्ट्र

maharashtra

कोलकाता घटनेवरुन हरभजन सिंग संतापला; ममतांना पत्र लिहित केली मोठी मागणी - Kolkata Incident

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 18, 2024, 5:38 PM IST

Harbhajan Singh on Kolkata Incident : कोलकाता येथील घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं पत्र लिहून संताप व्यक्त केलाय.

harbhajan singh
हरभजन सिंग (IANS Photo)

नवी दिल्ली Harbhajan Singh on Kolkata Incident : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेवरुन देशभरात निदर्शनं सुरु आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि आम आदमी पार्टीचे (आप) खासदार हरभजन सिंग यांचं वक्तव्य आलं आहे. भज्जीनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून पीडितेला न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र वेदना व्यक्त केल्या आहेत.

तत्काळ कारवाई करण्याचं आवाहन :हरभजन सिंगनं पत्रात लिहिलं, 'महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कायद्याच्या पूर्ण कडकडाटात सामोरं जावं आणि शिक्षा अनुकरणीय झाली पाहिजे. तरच आपण आपल्या व्यवस्थेवरील विश्वास पुनर्संचयित करु शकतो आणि अशी दुर्घटना पुन्हा कधीही होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. तसंच, आपण असा समाज निर्माण करु शकतो जिथं प्रत्येक स्त्रीला सुरक्षित आणि संरक्षित वाटेल. आपण स्वतःला विचारलं पाहिजे - आता नाही तर कधी? मला वाटतं, आता कारवाईची वेळ आली आहे.'

आठवड्याहून अधिक काळ लोटला : या पत्रात पुढं लिहिलं की, 'अशी क्रूरता एका वैद्यकीय संस्थेच्या आवारात घडली, जी उपचार आणि जीव वाचवण्यासाठी समर्पित ठिकाण आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे. एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे आणि आम्हाला अद्याप कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही, ज्यामुळं डॉक्टर आणि वैद्यकीय समुदाय रस्त्यावर उतरले आहेत. वैद्यकीय समुदाय आधीच आव्हानात्मक परिस्थितीत काम करत आहे. अशा घटनांनंतर त्यांची कर्तव्यं समर्पणानं पार पाडावीत अशी अपेक्षा आपण कशी करु शकतो, जेव्हा त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेला इतका गंभीर धोका असतो.

अन्य क्रिकेटपटूंनीही उठवला आवाज : अलीकडेच जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या प्रकरणावर संतापले होते. त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवून कारवाईची मागणी केली होती. तसंच ऋद्धिमान सहानं देखील यावरुन रोष व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. विश्वचषकात भिडणार नाही कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान; आयसीसीचा आश्चर्यकारक निर्णय - India vs Pakistan
  2. किशनची 'शान'दार फलंदाजी, दोन षटकार मारत संघाला दिला विजय मिळवून, पाहा व्हिडिओ - jharkhand win

ABOUT THE AUTHOR

...view details