सिडनी 6 Fours in An Over : एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना सुरु असताना त्याचवेळी आणखी एक सामना सुरु होता आणि त्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजानं नवा पराक्रम केला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसोबत ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बीबीएल सुरु आहे आणि त्यात बेन डॉकेटनं एकाच षटकात प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी खराब केला. इतकंच नाही तर यंदाच्या बिग बॅश लीगमधील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर केला.
BBL मध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना : आज बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना चांगला चालला असला तरी चौथ्या षटकात काहीतरी आश्चर्यकारक घडलं. सिडनी सिक्सर्स अकील हुसेन गोलंदाजीला आला. बेन डॉकेटनं पहिला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवून चौकार मारला. यानंतर डॉकेटनं दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरही असंच काहीसं केलं. यानंतरही तो थांबला नाही आणि एकामागून एक सहा चेंडूंवर सहा चौकार मारले. यापूर्वी अनेक फलंदाजांनी हे काम केलं असलं तरी अलीकडच्या काळात हे प्रथमच घडलं आहे.