ETV Bharat / sports

एक-दोन नव्हे तर 6 खेळाडूंनी केलं संघात पदार्पण, क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं अनोखं दृश्य - 6 PLAYERS DEBUT

क्रिकेटमध्ये, बॉक्सिंग-डे ला 3 कसोटी सामने सुरु झाले. या कालावधीत, 8 खेळाडूंचं कसोटी पदार्पण पाहिलं गेलं ज्यातील 6 खेळाडूंनी एकाच वेळी एका कसोटीत पदार्पण केलं.

6 Players Debut in Test Match
अफगाणिस्तान क्रिकेट संघ (ACB X Handle)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 27, 2024, 1:17 PM IST

बुलावायो 6 Players Debut in Test Match : 26 डिसेंबर 2024 ही तारीख कसोटी क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरात नोंदवण्यात आली आहे. हा दिवस क्रिकेटच्या दृष्टीनं खूप खास होता, जिथं एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. वास्तविक, एकाच दिवशी 3 बॉक्सिंग-डे कसोटी सामने सुरु झाले. ख्रिसमसच्या एक दिवसानंतर म्हणजेच 26 डिसेंबरला खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग-डे कसोटी सामना म्हणतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटीला मेलबर्नमध्ये सुरुवात झाली, तर यजमान दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सेंच्युरियनमध्ये सुरु झाली. या दोन्ही सामन्यांमध्ये 2 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं.

बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी अनेक विक्रम : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग-डे कसोटीत, सॅम कॉन्स्टासनं वयाच्या 19 व्या वर्षी कसोटी पदार्पण करुन इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा तो चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला. कॉन्स्टासनं पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून मोठी कामगिरी केली. याशिवाय 30 वर्षीय कॉर्बिन बॉशनं दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान बॉक्सिंग-डे कसोटीत पदार्पण केलं. कॉर्बिन बॉशनं कसोटी क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत एक मोठा विक्रम रचला. या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला.

एका सामन्यात 6 खेळाडूंना मिळाली कसोटी कॅप : या दोन कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरी बॉक्सिंग-डे कसोटी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरु झाली. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक-दोन नव्हे तर 6 खेळाडूंनी एकत्र पदार्पण केलं. यात झिम्बाब्वेच्या वतीनं 3 नवीन चेहऱ्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली तर अफगाणिस्ताननंही 3 खेळाडूंना कसोटी पदार्पणाची कॅप दिली. अशाप्रकारे 6 खेळाडूंनी एकाच कसोटी सामन्यात पदार्पण केलं, जे कसोटी क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतं.

कोणत्या खेळाडूंनी केलं पदार्पण : अफगाणिस्तानसाठी, सेदीकुल्ला अटल, एएम गझनफर आणि अझमतुल्ला ओमरझाई यांना कसोटी कॅप्स देण्यात आल्या, तर झिम्बाब्वेनं सॅम कुरनचा मोठा भाऊ बेन कुरन, ट्रेव्हर ग्वांडू आणि न्यूमन न्यामाहुरी यांचा प्रथमच कसोटी संघाच्या अकरा खेळाडूंमध्ये समावेश केला. यादरम्यान, बेन कुरननं आपल्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावून अप्रतिम कामगिरी केली.

हेही वाचा :

  1. स्टीव्ह 'सेंच्युरियन' स्मिथ... विराट, रुट, विल्यमसन, पाँटिंग सर्वांना मागे टाकत बनला 'नंबर वन'
  2. ना विराट, ना रोहित... DSP मोहम्मद सिराजचं मेलबर्न कसोटीत 'शतक'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.