मेलबर्न Most Runs Concedes Without Wicket : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भरघोस धावा केल्या. उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लॅबुशेन यांनी अर्धशतकं झळकावली. तर स्टीव्ह स्मिथनं शतक झळकावलं. मात्र पुन्हा एकदा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियासमोर हतबल राहिला. जसप्रीत बुमराहनं मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या. रवींद्र जडेजानं तीन बळी घेतले. आकाश दीपनंही दोन गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनंही एक विकेट घेतली. मात्र सिराजच्या विकेटचा कॉलम रिकामाच राहिला. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 23 षटकं टाकली. पण एकही विकेट घेऊ शकला नाही. यासह सिराजनं मेलबर्नमध्ये गोलंदाजीत 'शतक' झळकावलं आणि एक लज्जास्पद विक्रमही आपल्या नावावर केला.
Md Siraj - 23 overs, 122 runs, 0 wickets.🤡 pic.twitter.com/6mdFtgcQc7
— Out Of Context Cricketer (@GemsOfCricketer) December 27, 2024
10 वर्षे जुना विक्रम मोडला : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजनं विकेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्याला यश मिळालं नाही. उलट त्यानं भरपूर धावा खर्च केल्या. सिराजनं तब्बल 5.30 च्या इकॉनॉमीसह 122 धावा दिल्या. यासह, तो मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकही विकेट न घेता सर्वाधिक धावा करणारा भारतीय गोलंदाज बनला. त्याच्या आधी 2014 च्या कसोटीत इशांत शर्मानं एकही विकेट न घेता 104 धावा दिल्या होत्या. पण आता हा नकोसा विक्रम सिराजच्या नावावर झाला आहे.
Siraj has conceded runs at the Economy Rate of IPL in a Test Innings that too after bowling 21 overs 🤯 pic.twitter.com/L53QSApFfg
— Dinda Academy (@academy_dinda) December 27, 2024
यादीत कोणत्या गोलंदाजाचा समावेश : भारतीय गोलंदाजांनी एकही विकेट न घेता 100 पेक्षा जास्त धावा केल्याच्या गेल्या 10 घटना पाहिल्या तर त्यात सिराजचाही समावेश आहे. उमेश यादवनं 2023 मध्ये अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही विकेट न घेता 105 धावा दिल्या होत्या आणि भुवनेश्वर कुमारनं 2015 मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 122 धावा दिल्या होत्या. या प्रकरणातील सर्वात वाईट परिस्थिती होती ती इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांची, ज्यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2014 मध्ये वेलिंग्टन कसोटीत इशांतनं एकही विकेट न घेता 164 धावा दिल्या होत्या. तर 2012 मध्ये अश्विननं सिडनी कसोटीत एकही विकेट न घेता 157 धावा केल्या होत्या.
Siraj’s economy in the last five innings:
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) December 27, 2024
4.00, 6.75, 4.15, 5.14, 4.72.
pic.twitter.com/0yPYJmnk2N
सिराज बुमराहला साथ देऊ शकला नाही : या मालिकेत भारताचा अनुभवी आणि नंबर 1 कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कडवी झुंज दिली आहे. आतापर्यंत त्यानं 7 डावात 25 बळी घेतले आहेत. संघाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा बुमराहनं भारताला विकेट्स दिल्या. मात्र, दुसऱ्या बाजूनं त्याला त्याचा साथीदार मोहम्मद सिराजची साथ मिळाली नाही. सिराजनं या मालिकेत आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत पण गरजेच्या वेळी विकेट्स मिळवण्यात तो प्रभावी ठरला नाही. वेगवान गोलंदाजीत बुमराहला साथ देण्यात सिराजला यश आलेलं नाही.
हेही वाचा :