महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बीसीसीआयचे सचिव जय शाहांची मोठी घोषणा, पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना जाहीर केली मदत - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. 26 जुलैपासून ऑलिम्पिक सुरु होणार असून यात भारताचे 117 खेळाडू सहभागी होणार आहेत.

Paris Olympics 2024
बीसीसीआयचे सचिव जय शाहांची मोठी घोषणा (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 10:37 PM IST

मुंबई Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी काऊंटडाऊन सुरु झालं आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या क्रीडा महाकुंभात भारतातील 117 खेळाडू सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला मदत करण्याची मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयनं केली 8.5 कोटी मदत :बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं की, "आम्ही या मोहिमेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) 8.5 कोटी रुपये देत आहोत. देशाच्या संपूर्ण टीमला आमच्या शुभेच्छा. भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी करा, जय हिंद." बीसीसीआयच्या या आर्थिक योगदानामुळं 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या तयारीत सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा आहे. जे त्यांना त्यांच्या प्रशिक्षण आणि ऑलिम्पिकमधील सहभागाशी संबंधित विविध खर्च भागवण्यास मदत करेल.

मागच्या ऑलिम्पिकसाठी दिली होते 10 कोटी रुपये : बीसीसीआयनं यापुर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकसाठी 10 कोटी रुपये अनुदान दिलं होतं. यात लिक्विड फंडासाठी अडीच कोटी रुपये आणि प्रचारासाठी साडेसात कोटी रुपये देण्यात आले होते. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 7 पदकं जिंकली होती. त्यात फक्त एक सुवर्णपदक होतं. भारताला यावेळी एकूण पदकांसह सुवर्णपदकांची संख्या वाढवायची आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतानं आतापर्यंत 35 पदकं जिंकली आहेत. ज्यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली होती. आगामी पॅरिस ऑलिम्पिकचं उद्घाटन 26 जुलैला होणार आहे, त्यानंतर 27 जुलैपासून खेळाडू आपल्या खेळाला सुरुवात करतील.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कोणत्या वेळी होणार सामने, जाणून घ्या एका क्लिकवर - Paris Olympic 2024
  2. ऑलिम्पिकमध्ये कोणत्या राज्यातील किती खेळाडूंचा सहभाग? हरियाणाचे 24 खेळाडू, महाराष्ट्राचे फक्त... - Paris Olympics 2024
  3. ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे पदक का काढून घेतले जाते? जाणून घ्या, 'डोपिंग'ची गंभीर समस्या - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details