मुंबई India vs England Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून या संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयनं कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्स इथं खेळवला जाणार आहे, तर शेवटची कसोटी 31 जुलै रोजी होणार आहे. याशिवाय भारतीय संघ बर्मिंगहॅम, लॉर्ड्स आणि मँचेस्टर इथंही कसोटी सामने खेळणार आहे. याशिवाय महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, यात ते पाच टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. भारत-इंग्लंड महिला टी 20 मालिका 28 जून ते 12 जुलै दरम्यान चालणार आहे, तर एकदिवसीय मालिका 16, 19 आणि 22 जुलै रोजी होणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक :
- पहिली कसोटी - 20 ते 24 जून 2025, हेडिंग्ले
- दुसरी कसोटी - 2 ते 6 जुलै 2025, बर्मिंगहॅम
- तिसरी कसोटी - 10 ते 14 जुलै 2025, लॉर्ड्स
- चौथी कसोटी - 23 ते 27 जुलै 2025, मँचेस्टर
- पाचवी कसोटी - 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025, लंडन
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय महिला संघाचं वेळापत्रक :
- पहिला टी 20, 28 जून 2025, नॉटिंगहॅम
- दुसरा टी 20, 1 जुलै 2025, ब्रिस्टल
- तिसरा टी 20, 4 जुलै 2025, लंडन
- चौथा टी 20, 9 जुलै 2025, मँचेस्टर
- पाचवा टी 20, 12 जुलै 2025, बर्मिंगहॅम.
- पहिला एकदिवसीय, 16 जुलै 2025, साउथॅम्प्टन
- दुसरा एकदिवसीय, 19 जुलै 2025, लॉर्ड्स
- तिसरा एकदिवसीय, 22 जुलै 2025, चेस्टर-ली-स्ट्रीट