महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WATCH: 4,4,6,6... ट्रॅव्हिस हेडनं विस्फोटक फलंदाजीनं IPL दिग्गजाला धुतलं; थोडक्यात हुकला युवराजचा विश्वविक्रम - Travis Head Smashed Sam Curran - TRAVIS HEAD SMASHED SAM CURRAN

Travis Head Smashed Sam Curran : स्टार ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं बुधवारी साउथॅम्प्टन इथं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 दरम्यान पॉवर हिटिंगचं शानदार प्रदर्शन केलं. त्यानं अवघ्या 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Travis Head Smashed Sam Curran
ट्रॅव्हिस हेड (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 12, 2024, 12:46 PM IST

साउथॅम्प्टन Travis Head Smashed Sam Curran : स्टार ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं बुधवारी साउथॅम्प्टन इथं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात आपल्या पॉवर हिटिंगचं शानदार प्रदर्शन केलं. त्यानं अवघ्या 19 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हेडच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत 19.3 षटकांत 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडला 19.2 षटकांत केवळ 151 धावा करता आल्या. परिणामी त्यांना 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विस्फोटक खेळी करणाऱ्या हेडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

हेडनं सॅम कुरनला धुतलं : इंग्लंडचा कार्यवाहक कर्णधार फिलिप सॉल्टनं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय हेडनं चुकीचा सिद्ध केला. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक महागडा अष्टपैलू सॅम कुरनच्या एकाच षटकात या फलंदाजानं कहर केला. या षटकात हेडनं 30 धावा वसूल केल्या. त्यानं पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. त्यानंतर त्यानं सलग तीन षटकार ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर आणखी चौकार मारुन हेडनं सॅम कुरनची एकप्रकारे कारकीर्द उद्ध्वस्त केली.

पॉवरप्लेमध्येच 86 धावा : हेडच्या 23 चेंडूत 59 धावांच्या स्फोटक खेळीनं ऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवात करत पॉवरप्लेमध्ये 86 धावा केल्या. त्याच्या खेळीत पॉवर आणि प्लेसमेंटचे मिश्रण होतं. तो आऊट होईपर्यंत त्याची फटकेबाजी सुरुच होती. साकिब महमूदच्या चेंडूवर तो जॉर्डन कॉक्सकरवी झेलबाद झाला. त्याची विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं पॉवरप्लेमध्ये 86 धावा करत इंग्लंडला बॅकफूटवर आणलं.

T20 मध्ये हेड विस्फोटक फलंदाज : हेडची टी 20 मध्ये कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. त्यानं आतापर्यंत 181.36 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटनं 1,411 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये, केवळ दिग्गज आंद्रे रसेलनं त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी केली होती. विशेष बाब म्हणजे पॉवरप्लेमध्ये हेडचं वर्चस्व 2024 मध्ये अतुलनीय राहिले आहे. त्यानं एकट्या पॉवरप्लेमध्ये 500 हून अधिक धावा केल्या आहेत. या वर्षी त्यानं टी-20 मध्ये एकूण 1,027 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 60.4 आणि 192.3 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटनं देखील त्याचा फॉर्म आणि सातत्य मजबूत केलं.

लिव्हिंगस्टोननं घेतले 3 बळी : ऑस्ट्रेलियाकडून हेडशिवाय मॅथ्यू शॉर्टनं 26 चेंडूत 41 धावा केल्या. जोश इंग्लिशनं 27 चेंडूत 37 धावा केल्या. कॅमेरुन ग्रीन 13 धावा करुन बाद झाला तर मार्कस स्टॉइनिस 10 धावा करुन बाद झाला. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोननं 3 बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि साकिब महमूदनं प्रत्येकी 2-2 बळी घेतले. सॅम कुरन आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी 1 यश मिळालं.

इंग्लंडची 151 धावांपर्यंतच मजल : 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 19.2 षटकांत 151 धावांवर गारद झाला. त्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोननं 27 चेंडूत 37 धावा केल्या होत्या. फिलिप सॉल्टनं 20, सॅम कुरननं 18, जॉर्डन कॉक्सनं 17 आणि जेमी ओव्हरटननं 15 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सॅम ॲबॉटनं सर्वाधिक 3 बळी घेतले. जोश हेझलवूड आणि ॲडम झाम्पानं 2-2 विकेट घेतल्या. झेवियर बार्टलेट, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस यांनाही 1-1 यश मिळालं. उभय संघांमधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 13 सप्टेंबर रोजी कार्डिफ इथं खेळवला जाईल.

हेही वाचा :

  1. वनडे विश्वचषकाच्या आयोजनानं भारताला मोठा फायदा, कमावले 116370000000 रुपये - World Cup Impact on Indian Economy
  2. अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी सामना रद्द झाल्यास WTC ​च्या पॉइंट टेबलवर काय होणार परिणाम? भारताला फायदा की नुकसान? - WTC Point Table Update

ABOUT THE AUTHOR

...view details