शारजाह AFG vs BAN 2nd ODI Live Streaming : अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेला 2-1 नं वनडे मालिका पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघ पुन्हा मैदानात उतरला आहे. हाच आत्मविश्वास त्यांनी कायम ठेवत 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशचा 92 धावांनी दारुण पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता हा सामना जिंकत अफगाणिस्तान पुन्हा एकदा इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल तर बांगलादेशचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका :ही वनडे मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे ती आता फार दूर नाही. गेल्या वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पहिल्या वनडेत काय झालं : पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तान संघानं बांगलादेशचा 92 धावांनी धुव्वा उडवला. वास्तविक त्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 35 धावा करुन संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 49.4 षटकांत केवळ 235 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीनं सर्वाधिक 84 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवातही चांगली झाली नाही आणि अवघ्या 12 धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. तर बांगलादेशचा संपूर्ण संघ 34.3 षटकांत केवळ 134 धावांत गारद झाला. अफगाणिस्तानसाठी अल्लाह गझनफरनं सर्वाधिक सहा बळी घेतले.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आतापर्यंत 17 वेळा वनडे सामन्यांमध्ये आमनेसाममने आले आहेत. ज्यात बांगलादेशचा वरचष्मा दिसत आहे. बांगलादेशनं 17 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्ताननंही 7 सामने जिंकले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीचा सामना होतो.
खेळपट्टी कशी असेल : शारजाहच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळणं घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र सीमारेषा लहान असल्यानं त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देई शकतो.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 06 नोव्हेंबर (अफगाणिस्तान 92 धावांनी विजयी)
- दुसरा वनडे सामना : आज
- तिसरा वनडे सामना : 11 नोव्हेंबर
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?