महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

एका ओव्हरमध्ये 36 नव्हे तर झाल्या 77 धावा... क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक - 77 RUNS IN ONE OVER

क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले, पण एक लज्जास्पद विक्रम आजही अबाधित आहे.

77 Runs in One Over
रोहित शर्मा (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 15, 2024, 5:33 PM IST

मुंबई 77 Runs in One Over : क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम झाले आणि मोडले गेले, पण एक लज्जास्पद विक्रम आजही अबाधित आहे. तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल की एका षटकात म्हणजे 6 चेंडूत 77 धावा झाल्या आहेत. हा विक्रम न्यूझीलंडमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झाला, जेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागड्या षटकाची नोंद झाली होती. न्यूझीलंडकडून 4 कसोटी खेळणाऱ्या बर्ट व्हॅन्सच्या नावावर हा लज्जास्पद विक्रम आहे.

एका षटकात टाकले 17 नो बॉल :न्यूझीलंडमधील वेलिंग्टनच्या बर्ट व्हॅन्सनं 20 फेब्रुवारी 1990 रोजी कँटरबरी विरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात 22 चेंडूंचं ओव्हर टाकलं. या सामन्यात कँटरबरीला 2 षटकांत विजयासाठी 95 धावांची गरज होती, त्यानंतर व्हॅन्सनं 17 नो बॉल टाकत एका षटकांत 77 धावा दिल्या. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ली जर्मननं क्रिकेटच्या एका षटकांत 70 धावा दिल्या होत्या. क्रिकेटच्या कोणत्याही षटकात फलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या होती. चला जाणून घेऊया क्रिकेटच्या या षटकाची कहाणी.

न्यूझीलंडच्या खेळाडूवर लाजिरवाणा विक्रम : न्यूझीलंडकडून चार कसोटी सामने खेळणारा माजी क्रिकेटपटू बर्ट व्हॅन्सच्या नावावर क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडं षटक टाकण्याचा विक्रम आहे. त्यानं आपल्या एका षटकात 77 धावा दिल्या. वास्तविक 1990 मध्ये, एका प्रथम श्रेणी सामन्यात, कँटरबरीचा खेळाडू ली जर्मननं एका षटकात 70 धावा अतिशय स्फोटक पद्धतीनं केल्या होत्या. तर त्याचा सहकारी खेळाडू रॉजर फोर्डनं ५ धावा केल्या. विशेष म्हणजे या षटकात बर्ट वन्सनं एकूण 22 चेंडू टाकले.

बर्ट वन्सनं टाकलेलं ओव्हर खालीलप्रमाणे :

वन्सच्या षटकातील चेंडूंवर धावा - 0,4,4,4,6,6,4,6,1,4,1,0,6,6,6,6,0,0,4,0,1

नेमकं काय घडलं होतं : क्राइस्टचर्चमध्ये कँटरबरी विरुद्ध वेलिंग्टनच्या शेल ट्रॉफी सामन्याच्या अंतिम दिवशी ही घटना घडली. वेलिंग्टनचा हा हंगामातील शेवटचा सामना होता आणि डाव घोषित केल्यानंतर त्यांनी कँटरबरीला 59 षटकांत 291 धावांचं लक्ष्य दिलं. कँटरबरीची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 108 धावांत त्याच्या 8 विकेट पडल्या, त्यामुळं वेलिंग्टन सामना सहज जिंकेल असं सर्वांना वाटत होतं, परंतु यानंतर सामना फिरला. वेलिंग्टनच्या कर्णधार-विकेटकीपरनं एक योजना आखली आणि न्यूझीलंडचा फलंदाज बर्ट व्हॅन्स, जो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी होता, त्याला गोलंदाजी करायला लावली. जर्मन ली आणि रॉजर फोर्ड यांनी सोप्या गोलंदाजीविरुद्ध धावा केल्या तर तो चूक करेल आणि बाद होईल, असा कर्णधाराचा विश्वास होता. पण कर्णधाराची ही चाल त्याच्यावरच उलटली.

22 चेंडूत 77 दिल्या धावा : बर्ट व्हॅन्सनं या षटकात अतिशय खराब सुरुवात केली. त्यानं सतत नो बॉल टाकले. पहिल्या 17 चेंडूंमध्ये त्यावं फक्त एक कायदेशीर चेंडू टाकला. यादरम्यान जर्मन लीनं शानदार पद्धतीनं आपलं शतक पूर्ण केलं. वन्सनं या षटकात एकूण 22 चेंडू टाकले आणि 77 धावा दिल्या. यानंतर कँटरबरी संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज होती. जर्मन लीनं पहिल्या पाच चेंडूंवर 17 धावा केल्या, पण शेवटच्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही आणि सामना अनिर्णित राहिला. आपल्या कारकिर्दीत, बर्ट व्हॅन्सनं 4 कसोटीत 1 अर्धशतक आणि 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 248 धावांच्या मदतीनं 207 धावा केल्या.

हेही वाचा :

  1. बेंगळुरुत मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत; भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट, कसं असेल हवामान? वाचा सविस्तर
  2. विराट-रोहितला खेळताना स्टेडियममध्ये बघायचं? रेल्वे तिकिटापेक्षा स्वस्तात मॅचचं तिकिट; 'असं' खरेदी करा ऑनलाइन आणि ऑफलाइन

ABOUT THE AUTHOR

...view details