17 Runs in 1 Ball : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 चेंडूवर 17 धावा करण्याचा विश्वविक्रम जगात एकाच फलंदाजाच्या नावावर आहे. जगातील कोणताही फलंदाज 1 चेंडूवर 17 धावा काढण्याचा विचारही करु शकत नाही, कारण हे एक अशक्य काम आहे, परंतु भारताचा एक स्फोटक फलंदाज आहे, ज्यानं हे अशक्य कामही शक्य करुन दाखवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाजही एका चेंडूवर 17 धावा करण्याचा पराक्रम करु शकले नाहीत.
कोणत्या फलंदाजानं केल्या 1 चेंडूवर 17 धावा : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 चेंडूवर 17 धावा करण्याचा पराक्रम फक्त एकाच फलंदाजानं केला आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आहे. भारताचा माजी झंझावाती सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं 13 मार्च 2004 रोजी कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज राणा नावेद उल हसनच्या एका चेंडूवर 17 धावा काढल्या होत्या. आजपर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला वीरेंद्र सेहवागचा हा विश्वविक्रम मोडता आलेला नाही.
रोहित-गेलसारख्या दिग्गजांनाही करता आला नाही हा चमत्कार : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि ख्रिस गेलसारखे स्फोटक फलंदाजही एका चेंडूवर 17 धावा करण्याचा पराक्रम करु शकलेले नाहीत. वीरेंद्र सेहवागबद्दल बोलायचं झाले तर त्याची फलंदाजीची शैली वेगळी होती. वीरेंद्र सेहवागनं 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वीरेंद्र सेहवागसारखा फलंदाज भारताला अजून सापडलेला नाही.