हैदराबाद : पेटीएमनं (One 97 Communications Limited) व्यापाऱ्यांसाठी 'पेटीएम सोलर साउंडबॉक्स' लाँच करण्याची घोषणा केली आहे. 'पेटीएम सोलर साउंडबॉक्स' भारतातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असणार आहे. या नाविन्यपूर्ण उपकरणाला जलद चार्जिंगसाठी कमीत कमी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यामुळं पूर्ण दिवस वीज टीकून राहते, ज्यामुळं सलग पेमेंट करता येते. भारतातील लहान दुकान मालक आणि व्यापाऱ्यांना विश्वासार्ह, सातत्यपूर्ण यामुळं सेवा मिळणार आहे.
Introducing the Paytm Solar Soundbox – an innovation by our Founder & CEO @vijayshekhar that runs on solar power, works even in minimal sunlight, reduces electricity costs and provides instant payment alerts. ☀️🔊
— Paytm (@Paytm) February 20, 2025
⚡ Auto-charges in sunlight
🔋 10-day long-lasting battery
🥳… pic.twitter.com/MbLvGDhZa6
पर्यायी ऊर्जा स्रोताचा वापर
मेड इन इंडिया पेटीएम सोलर साउंडबॉक्स हा एक पर्यावरणपूरक उपाय आहे, जो कमी किमतीच्या पर्यायी ऊर्जा स्रोताचा वापर करतो, ज्यामुळं ग्रामीण आणि दुर्गम भागातील तसंच वीज टंचाईचा सामना करणाऱ्या ठिकाणांमधील व्यापारी डिजिटल इकोसिस्टमचा भाग बनू शकतो. पेटीएम आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देत आहे.
सूर्यप्रकाशात ऑटो-चार्ज
हे परवडणारे उपकरण वरच्या बाजूला सोलर पॅनेलनं सुसज्ज आहे, ज्यामुळं ते सूर्यप्रकाशात ऑटो-चार्ज होऊ शकते. यात सौर उर्जेनं चार्ज होणाऱ्या दोन बॅटरी आणि विजेनं चार्ज होणाऱ्या दुसऱ्या बॅटरी आहेत. पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यावरही, सौर बॅटरी फक्त 2-3 तास सूर्यप्रकाशात राहिल्यानंतर पूर्ण दिवस वीज प्रदान करू शकते. वीजेवर चालणारी बॅटरी रिचार्ज न करता 10 दिवसांपर्यंत टिकू शकते. यामुळं वारंवार चार्जिंगची गरज कमी होते आणि ग्रीन एनर्जीला समर्थन मिळतं. यात पेटीएम क्यूआर कोड आहे, जो ग्राहक स्कॅन करून यूपीआय आणि रुपे क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंट करू शकतात.
4G-कनेक्टेड डिव्हाइस
विशेषतः भारतातील लहान व्यापाऱ्यांसाठी, ज्यात फेरीवाले, गाडी विक्रेते, कारागीर, हस्तकला विक्रेते, फुले विक्रेते आणि इतर अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांचा समावेश आहे. पेटीएम सोलर साउंडबॉक्स हे एक 4G-कनेक्टेड डिव्हाइस आहे. याचं एक उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे शक्तिशाली 3-वॅट स्पीकर आहे. उच्च-गुणवत्तेचं ऑडिओ असल्यामुळं व्यापाऱ्यांना पेमेंटची गोंगाटाच्या वातावरणातही सूचना ऐकू येते. हे डिव्हाइस 11 भाषांमध्ये ऑडिओ सूचनांना समर्थन देतं, जे संपूर्ण भारतातील विविध श्रेणीतील व्यापारी आणि ग्राहकांना सेवा देतं.
हे वाचलंत का :