हैदराबाद Third Shravan Somwar 2024 :श्रावणाची (Shravan 2024) सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जात. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरूवात सोमवारी झाली आहे. आता बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून येत आहे. त्यामुळं यंदाचा श्रावण हा शुभ मानला जात आहे.
श्रावणाचा तिसरा सोमवार : महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते. 19 ऑगस्ट 2024 हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे. श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात.
या पद्धतीनं करावी महादेवाची पूजा: सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करावी. सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी. भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा. यानंतर भगवान शिवला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुले, मध, फळे, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी. शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी.