मेष (ARIES): वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळं कोणाशी संघर्ष होणार नाही आणि त्यामुळं आपण आणि समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक आणि कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता राहिल. त्यामुळं उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अर्थविषयक कामे कराल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल.
वृषभ (TAURUS):वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक आणि मानसिकदृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील आणि त्यामुळं आलेली एखादी संधी हातून निसटेल. आपल्या हटवादीपणामुळं इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा. भावंडांशी आपुलकी वाढल्यानं अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल.
मिथुन (GEMINI) :वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क (CANCER) :वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजची सकाळ कौटुंबिक, व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळं काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, काही ना काही कारणानं मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. हाती असलेली कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. खर्चात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
सिंह (LEO) :वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या दशम भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र आणि कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. एखाद्या स्त्रीमुळं लाभ होतील. मुलांनकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या (VIRGO) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी, व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचं आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. सामाजिक मान-सन्मान होतील.
तूळ (LIBRA) : वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.