महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

देवेंद्र फडणवीसांकडून 'बावनकुळे' चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण - DEVENDRA FADNAVIS

मुंबईत शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली. दरम्यान, नागपुरातील एका चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण आलंय. तर हा 'चहावाला' आहे तरी कोण? जाणून घेऊ...

Gopal Bawankule
नागपूर चहा विक्रेता गोपाल बावनकुळे (Source : ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 6:10 PM IST

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नाही. परंतु, फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण : 5 डिसेंबरला नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. भाजपानं अद्याप नावाची घोषणा केली नसली तरी, शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यास सुरुवात झाली आहे. नागपूरच्या रामनगर येथील चहाचे दुकान चालवणारे गोपाल बावनकुळे यांना या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचं निमंत्रण फोनद्वारे मिळालं असल्याची माहिती गोपाल यांनीच दिली.

चहा विक्रेता गोपाल बावनकुळे यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण (ETV Bharat Reporter)

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : शपथविधीचं निमंत्रण मिळाल्यामुळं गोपाल बावनकुळे यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना निमंत्रण येऊ लागल्यानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच शपथ घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गोपाल बावनकुळे फडणवीसांचे मोठे फॅन : चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत. रामनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून गोपाल हे चहाचा स्टॉल चालवतात. त्यांनी चहाच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील लावला आहे. शपथविधीसाठी निमंत्रण मिळाल्यामुळं मुंबईसाठी निघणार असल्याचं गोपाल यांनी सांगितलं.

अशी झाली ओळख : देवेंद्र फडणवीस यांना चहाप्रेमी म्हणून ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी फडणवीस हे गोपाल यांच्या चहाच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबले होते. गोपाल यांनी बनवलेला चहा फडणवीस यांना फार आवडला होता. गोपाल यांच्या चहाची चव न्यारी असल्याचं म्हणत त्यावेळी फडणवीस यांनी चहाची प्रशंसा केली होती. तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाल्याचं खुद्द गोपाल बावनकुळे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. ईटीव्ही भारत विशेष : 26/11 मुंबई हल्ल्यातील साक्षीदार छोटूला काहीतरी सांगायचंय !
  2. दिल्ली निवडणूक : विनामूल्य चहा देऊन गुजराती युवक करतोय केजरीवालांचा प्रचार
  3. Mahaparinirvan Din 2022 : इंदू मिलचं काम लवकरच पूर्ण होईल; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details