मुंबई Thackeray group Candidates - शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. ठाकरे गटाकडून २३ जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
- सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू होती. विश्वजीत कदम हे काँग्रेसच्या जागेसाठी आग्रही आहेत. चंद्रहार पाटील यांना सांगलीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानं काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
- रायगडमध्ये अनंत गीतेंना संधी देण्यात आली आहे.
- चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अंबादास दानवे हे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक होते.
- धाराशिवमध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
- मावळमधून संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटानं लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे.
- सांगलीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटानं तिकीट दिलं आहे. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी हा महाविकास आघाडीत डोकेदुखीचा विषय ठरला होता.
- दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
- सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून विनायक राऊत हे लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत.
- शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
- बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर हे ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत.
- नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर ठाण्यातून राजन विचारे यांना संधी देण्यात आलेली आहे.
- यवतमाळ-वाशिमध्ये संजय देशमुख, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, मुंबई-ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई-वायव्यमधून अमोल कीर्तिकर आणि परभणीमधून संजय जाधव हे ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण मध्यची उमेदवारी देण्यात आली आहे.