प्रतिक्रिया देताना विखे पाटील समर्थक अभय शेळके शिर्डीLok Sabha Election 2024 : 'अबकी बार चार सौ पार का नारा' देत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर भाजपा कार्यकर्त्यांचा नाराजीची सूर दिसून आलाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता म्हणून उमेदवार मिळावा अशी मागणी, भाजपाचे महाराष्ट्र कमिटी निमंत्रीत सदस्य शिवाजी गोंदकर यांनी शिर्डीत केलीय.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा युतीकडं : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात मोठी ताकत भाजपाची असून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळं ही जागा भाजपालाच मिळावी अशी मागणी, भाजपाकडून आयोजित पत्रकार परिषेदत करण्यात आली. गेल्या पंधरा वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा युतीकडं असून यावर दहा वर्षापासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. मात्र शिर्डी लोकसभा केंद्रांच्या योजनापासून वंचित राहील्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तर एक प्रकारे लोखंडे यांच्यावर नाराजीचा सूर दिसून येत आहे.
शिर्डीची लोकसभेची जागा भाजपाला मिळावी : देशातील महत्वाची तिर्थक्षेत्रावर भाजपाचे खासदार असून शिर्डी देखील आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र आहे. याठिकाणी भाजपाचा खासदार असल्यास शिर्डीचा विकासाबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा विकास होईल. त्यामुळं शिर्डीची लोकसभेची जागा भाजपाला मिळावी अशी आग्रही मागणी, शिर्डी भाजपाकडून करण्यात आलीय.
शिर्डीच्या जागेवरुन तणाव वाढणार?: राज्यातील लोकसभेच्या जागावर महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यात शिर्डीच्या जागा या पुर्वी एनडीएमध्ये सहभागी असलेल्या रामदास आठवलेंनी उमेदवारी मागितलीय. त्यात दहा वर्षे खासदार राहीलेले सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना साथ दिली. त्यामुळं आता भाजपा कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर महायुतीत शिर्डीच्या जागेवरुन तणाव वाढणार असल्याचं दिसून येतय. दुसरीकडं एनवेळी नवखा उमेदवार शिर्डी लोकसभेसाठी दिली जाईल असंही दिसून येतय.
कार्यकर्त्यांच्या मागणीला विखे पाटील यांचा पाठींबा : शिर्डी लोकसभेची जागा युतीत या पुर्वी शिवसेनेकडं होती. मात्र आता महायुतीत आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. यामुळं ही जागा एकनाथ शिंदेंची शिवसेना लढविणार असल्याचा बोललं जात असतांना, आता भाजपाच्या शिर्डी आणि श्रीरामपूरच्या कार्यकर्त्यांनी शिर्डीच्या लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केलीय. कार्यकर्त्यांच्या मागणीला आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही पाठींबा दिला आहे. जी कार्यकर्त्यांची मागणी तीच माझी मागणी असं विखे पाटील यांनी म्हटल्यानं महायुतीच्या शिर्डीच्या जागेवर भाजपाने दावा केल्याचं समोर आलंय.
नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार? : शिर्डीतून निवडणूक लढण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले देखील इच्छुक आहेत. तर शिवसेनेकडून माजी मंत्री राहीलेले बबनराव घोलप हे शिर्डीतून उध्दव ठाकरेंनी उमेदवारी न दिल्यानं नाराज होत एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होत आहेत. तर दुसरीकडं विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे तिसऱ्यांदा संधी मिळण्याची आस धरुन आहेत. मात्र आता भाजपाने या जागेवर दावा सांगितल्यानं नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार? याची उत्सुकता असून ही जागा राखण्यात एनडीला यश येतं की, उध्दव ठाकरेंची शिवसेना या जागेवर आपला उमेदवार निवडणून देण्यात यशस्वी होते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'या' राज्यात कॉंग्रेसला भगदाड; माजी केंद्रीय मंत्र्यांसह डझनहून अधिक नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
- 'सरकारला निष्पक्ष निवडणुका नको आहेत'; अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका
- "शिंदे-पवारांना प्रत्येकी साडे सहा जागा मिळणार", महायुतीतील जागावाटपावरुन चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य