महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी'ला केलं रामराम - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधासनभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशातच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय.

ASSEMBLY ELECTION 2024
शरद पवार (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2024, 9:53 PM IST

अमरावती : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुरुवारी अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांचा पदावरून पायउतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केला.

जिल्हाध्यक्षांचा केला पायउतार :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदार संघाची प्रमुख जबाबदारी होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढून त्यांच्यावर प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. विश्वासात न घेता आपल्याला पदावरून काढलं, अशी नाराजी प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली.

प्रदीप राऊत यांनी व्यक्त केला नाराजी (Source - ETV Bharat Reporter)

पक्षनिष्ठेचा व कार्याचा अवमान :"पाच महिन्यात आम्ही पक्ष संघटना मजबूत केली नव्या नेतृत्वाची फळी उभी केली, असं असताना कुठलंही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा व कार्याचा अवमान असल्यामुळं आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत," असं प्रदीप राऊत यांनी सांगितलं. प्रदीप राऊत यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष किशोर बर्डे सामाजिक न्याय विभागाचे सुनील कीर्तनकार आदी पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिलेत.

स्थानिक नेत्यांवर आरोप :आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला, त्यासाठी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विधानसभेचे माजी उपसभापती शरद तसरे, प्रकाश बोंडे हे नेते जबाबदार असल्याचा आरोपही प्रदीप राऊत यांनी केला. पक्ष वाढीसाठी शून्य कर्तृत्व असणाऱ्या या नेत्यांनी वरिष्ठांची कान भरणी केली, असं देखील प्रदीप राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

  1. विदर्भासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 'मिशन 51'; भाजपाला तारणार का?
  2. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; 'हे' घेतले महत्त्वाचे ३८ निर्णय
  3. हरियाणातील विजयाचा पॅटर्न भाजपा महाराष्ट्रात राबवणार; नेमकी रणनीती काय?

ABOUT THE AUTHOR

...view details