महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज; मला तिसऱ्यांदा खासदार म्हणून जनता निवडून देईल - राजन विचारे - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vikhare) यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

Lok Sabha Election 2024
राजन विचारे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 10:53 PM IST

प्रतिक्रिया देताना राजन विचारे

ठाणे Lok Sabha Election 2024 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vikhare) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्यानं ठाण्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली.

शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल: राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं हे ठाणेकरांचं प्रेम असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचं जुनं नातं आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



दिल्लीश्वर म्हणतात मुख्यमंत्री तुम्हीच लढा : राजन विचारे यांच्यासमोर कोणीच लढण्यास तयार नाही. त्यामुळं कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न पडला असताना, मुख्यमंत्री तुम्हीच लढा असं दिल्लीश्वरानाचं म्हणणं असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच ही विजयाची रॅली असल्याचं विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.


मोठी वाहतूक कोंडी: सकाळपासूनच राजन विचारे यांनी कोपीनेश्वर मंदिर आनंद दिघे स्मृतीस्थळ मुख्य मार्केट मार्गावरुन ठाकरे गटानं शक्तिप्रदर्शन केलं. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर चिंतामणी चौकामध्ये एक छोटेखानी सभा देखील झाली. या संपूर्ण कार्यक्रमामुळं परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.



हेही वाचा -

  1. इचलकरंजीत प्रचार सभेत गोविंदा यांचा धम्माल डान्स; खासदार धैर्यशील मानेंच्या प्रचाराचा महिला मेळावा गोविंदानी गाजवला - Lok Sabha Election 2024
  2. "जे समोर लढू शकत नाहीत ते फेक व्हिडिओ...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  3. दक्षिण मध्य मुंबईत दोन मित्र भिडणार; राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details