महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

रायगड लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? कुणबी मतं ठरणार निर्णायक - अनंत गीते

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत कोकणातील रायगड हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आणि चुरशीचा ठरणार आहे. या मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात महायुतीच्या वतीनं सुनील तटकरे तर महाविकास आघाडीच्या वतीनं अनंत गीते निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. या दोघांपैकी ज्याच्या पारड्यात कुणबी मतं अधिक जातील तो विजयी होणार हे निश्चित.

raigad lok sabha elections 2024 Who win in Raigad Lok Sabha elections will be depend on Kunbi votes
रायगड लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? कुणबी मतं ठरणार निर्णायक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 9:10 PM IST

मुंबई Lok Sabha Elections 2024 : कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन लोकसभा मतदारसंघ नेहमी चर्चेचा विषय ठरलेले असतात. यातील रायगड लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेनं 1995 पासून 2014 पर्यंत आपल्याकडे राखला होता. मात्र, 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पहिल्यांदाच पराभव केला. आगामी लोकसभा निवडणुकीत आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या अनंत गीते यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर या मतदारसंघात भाजपाने दावा केला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) दावा केल्यामुळं सुनील तटकरे पुन्हा एकदा मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

मतदार संघातील राजकीय समीकरणे : रायगड मतदारसंघांमध्ये कोकणातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यात दापोली, राजापूर पेण, अलिबाग, रायगड या मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ पासून गुहागर पर्यंत विस्तीर्ण असलेल्या या मतदार संघातील राजकीय समीकरणं सध्या बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळं विद्यमान खासदार अजित पवार यांच्या गटातून म्हणजेच महायुतीतून निवडणूक लढवतील. त्यामुळं भाजपाच्या धैर्यशील पाटील यांना संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं पाटील काहीसे नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार योगेश कदम, भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे हे आमदार सध्या शिंदे गटात असल्यामुळं महायुती मजबूत वाटत असली तरी माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाली आहे. तसंच शेतकरी कामगार पक्षानं देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही लढत तुल्यबळ होणार आहे.

मतदार संघातील समस्या : या मतदारसंघांमध्ये रोजगाराचा औद्योगिक विकासाचा आणि बारगळलेल्या सेझ चा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासोबत गेली अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा महत्त्वाचा प्रश्न या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातील मुख्य शेती ही भात पिकांची आहे. त्यामुळं धान्याला योग्य दर मिळण्याची शेतकऱ्यांची सातत्याची मागणी आहे. तर दुसरीकडं कोळीवाड्यांचे आणि मच्छीमारांचे काही प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत.

जातनिहाय रचना : या मतदारसंघांमध्ये जातीची समीकरणं पाहिली तर सर्वात जास्त संख्या ही कुणबी मतदारांची आहे. त्या पाठोपाठ या मतदारसंघात मुस्लिम समाजही मोठ्या संख्येनं आहे. अनुसूचित जाती आणि जमाती मधील मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र, या मतदारसंघात नेहमीच कुणबी मतदारांची मतं ही निर्णायक ठरत असतात. गेल्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना 40000 मते तर अनंत गीते यांना चार लाख 55 हजार मतं मिळाली होती.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणूक 2024; भाजपा प्रत्येक लोकसभेला करणार कोट्यवधींचा खर्च, हा पैसा येतो कुठून? रोहित पवारांचा सवाल
  2. लोकसभा निवडणुकीत 'या' मतदारांना घरबसल्या मतदानाची सोय, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
  3. दक्षिण मुंबई बहुभाषिक लोकसभा मतदार संघात काय आहेत राजकीय समीकरणे? महायुतीपुढे ठाकरे गटाचं आहे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details