ETV Bharat / state

खातेवाटपाचा मुहूर्त ठरला! आज रात्री किंवा उद्या खातेवाटपाची लॉटरी फुटणार - मुख्यमंत्री - PORTFOLIO ALLOCATION OF MINISTERS

अधिवेशनात भरगच्च कामकाज झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसंच खातेवाटप लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस, शिंदे
फडणवीस, शिंदे (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2024, 7:25 PM IST

नागपूर/मुंबई - हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. शेवटच्या दिवशी खातेवाटप लवकरच होणार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी खाते वाटप झालेलं तुम्हाला दिसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

अजितदादा नाराज नाहीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, अजितदादा माझी परवानगी घेऊन बीडच्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेत. त्यामुळं तुम्ही अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या चालवू नये. चुकीच्या बातम्या नको म्हणून स्पष्टीकरण देतोय, असं फडणवीस म्हणाले. विरोधकांनी फक्त विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. मात्र सभागृहात हेच प्रश्न उपस्थित केले असते तर बरं झालं असतं. सहा दिवसात भरगच्च कामकाज झालं. चर्चा करून 17 विधेयकं मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटीची रुपयांची तरतूद करण्यात आली. विशेष म्हणजे नक्षलवादी मुद्दा सभागृहात मांडला गेला. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला हे सरकार काय देणार? यावर मी सभागृहात सव्वा तास बोललो आहे. बळीराजा योजनेसाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रमधील मागासवर्ग हा मुख्यत: आमच्या विकासाचा अजेंडा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चौफेर विकासकामांना प्राधान्य - सध्या कापूस तुरीला चांगला भाव मिळतोय. सीसीआयमध्ये कापूस येत नाही. राज्यातील मागास भागात आमच्या सरकारनं परिवर्तन केलं. 0.72 टक्के व्याजाने नागपूर मेट्रोसाठी कर्ज घेतलं. विदर्भ-मराठवाड्यातील पिकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. संत्री बागायतदारांना सरकारनं त्यांची नुकसान भरपाई दिली. नागपूर मेट्रोतील दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती देत आहोत. नागपूर मेट्रोसाठी 3500 कोटी रुपये कर्ज घेतलं. 10 लाख नागपूरकरांना मेट्रोचा फायदा होणार आहे. चौफेर विकासकामं करण्यावर आमचा भर असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातील प्रत्येक घटक आणि माणसाला न्याय देण्याचं काम हे सरकार करणार आहे. 1000 लोकसंख्येतील गावात काँक्रीटचे रस्ते करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.

गड-किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना दंड - पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समूह विद्यापीठाचा कायदा तयार केला. राज्यात 3 नवीन विद्यापीठं तयार होत आहेत. क्लस्टर विद्यापीठाचा कायदा मंजूर करण्यात आला. गड-किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकार पुढाकार घेणार असून, गड-किल्ल्यावर कोण गैरवर्तन, दुर्गंधी किंवा घाण करणाऱ्यांवर दंड करण्यासाठी विधेयक आणणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कारागृह कायदा जुना होता. त्यात सुधारणा करण्यात आली. नवीन कायदा मंजूर करण्यात आला. बांबू लागवडीसाठी करार करण्यात आला. बांबू उत्पन्नातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतोय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित आहे. परभणी किंवा बीड प्रकरणात जो कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. हे सरकार कुणालाही सोडणार नाही. पोलीस जे दोषी असतील त्यांचा शोध घेतील. अवैधरित्या जे मुंबईत बांग्लादेशी राहात आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसंच नॅशनल लॉ स्कूलच्या नावात बदल करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.

सूर्यवंशीला पोलिसांकडून मारहाण नाही - दीक्षाभूमीच्या ज्या मागण्या आहेत, त्या मान्य केलेल्या आहेत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयित मृत्यू झाला आहे. याचे पडसाद राज्यभर उमटाताहेत. यावर बोलताना, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी करणार आहोत. त्यातून सत्य समोरी येईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सोमनाथ सूर्यवंशी याला श्वसनाचा त्रास होता. त्यांना दुर्धर आजार होता, असं रिपोर्टमध्ये आलं आहे. अनेक जखमा होत्या असं दाखवण्यात आलं आहे. सोमनाथ सूर्यवंशीवर पोलिसांकडून मारहाण झाली नाही. सीसीटीव्हीमध्ये कुठेही मारहाण झाल्याचं दाखवत नाही. असं फडणवीस म्हणाले.

अधिवेशनात सहा दिवसात भरगच्च कामकाज झालं. देशातील कुठल्याही राज्यातील विधानसभेच्या कामकाजापेक्षा आमचं सर्वाधिक कामकाज झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शंभरच्यावर संघटना सहभागी झाल्या होत्या, यात नक्षलवादी संघटना देखील सहभागी झाल्याची माहिती समोर आली होती. अशी टीका फडणवीसांनी गांधींच्या भारत जोडो यात्रेवर केली.

टीम जुनीच, मॅच मात्र नवीन - टीम जुनीच, मॅच मात्र नवीन असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्राचीन स्मारकाबाबत अनेक विधेयकं मंजूर झाली. पूर्वीच्या सर्व योजना सुरू राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तरतूद यावर चर्चा करण्यात आली. लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आधीच्या सर्वच्या सर्व योजना तशाच सुरू राहणार. यापुढे आणखीन जलदगतीने निर्णय घेऊ, विदर्भातील अनेक प्रकल्पांना न्याय दिला. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांच्या प्रश्नांचा देखील आम्ही विचार केला. पुणे विमानतळाला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं नाव देण्याचा विचार करू. अधिवेशन विदर्भात होत असताना विदर्भासाठी सरकारनं काय केले नाही? हे मुद्दे सभागृहात उपस्थित करणं अपेक्षित होतं. मात्र विरोधकांनी विधानभवनाच्या पायावर आंदोलन करत हे मुद्दे उपस्थित केले हे दुर्दैवी आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा..

  1. 'टी-20 मॅच खेळलो, अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो', जयंत पाटलांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांची जोरदार बॅटिंग
  2. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा शिवसेना उबाठाची तयारी; नाना पटोले म्हणाले मग संजय राऊतांना कोणी अडवलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.