महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

पंतप्रधान मोदींवर विश्वास म्हणजे विश्वासघाताची हमी-राहुल गांधी

Bharat Jodo Nyay Yatra Today: राहुल गांधी हे राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनविश्वास रॅलीत सहभागी होणार आहेत. यासाठी राहुल गांधी पाटणा येथे पोहोचणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी रेल्वे धोरणावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली.

जनविश्वास रॅलीत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी पाटण्यात; रॅलीद्वारे 'इंडिया' आघाडीचा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
जनविश्वास रॅलीत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी पाटण्यात; रॅलीद्वारे 'इंडिया' आघाडीचा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

By ANI

Published : Mar 3, 2024, 2:03 PM IST

Updated : Mar 3, 2024, 2:17 PM IST

ग्वालियरBharat Jodo Nyay Yatra Today:लोकसभा निवडणुकीपूर्वी 'इंडिया' आघाडी आज बिहारमध्ये आपलं शक्तीप्रदर्शन करणार आहे. पाटणा येथील गांधी मैदानावर जनविश्वास महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलीय. 'इंडिया' आघाडीतील सर्व घटक पक्ष म्हणजेच आरजेडी, काँग्रेस, डावे पक्ष, अखिलेश यादव यांचा सपा आणि इतर अनेक छोटे पक्षही या रॅलीत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र या महारॅलीच्या आयोजनाची जबाबदारी मुख्यतः लालूप्रसाद यांच्या आरजेडीची आहे.

'इंडिया'आघाडीचं शक्तीप्रदर्शन : पाटणा येथील गांधी मैदानावर होणाऱ्या या मेगा रॅलीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, डाव्या पक्षाचे नेते डी राजा, माकपाचे सीताराम येचुरी, दीपंकर भट्टाचार्य, उत्तर प्रदेश काँग्रेसचे माजी नेते याशिवाय मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीपूर्वी 'इंडिया' आघाडीचा हा एकजूट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी बिहारची निवड करण्यात आलीय.

राहुल गांधी होणार सहभागी : या जनविश्वास महारॅलीत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी हे ग्वालियरहून निघाले असून ते दुपारपर्यंत पाटण्याला पोहोचतील. त्यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल राव हेही पाटण्यात येणार आहेत. हे सर्व नेते विशेष विमानानं एकत्र पाटण्याला पोहोचतील. पाटणा येथील गांधी मैदानावर होणाऱ्या महागठबंधनाच्या जनविश्वास महारॅलीसाठी सकाळपासूनच समर्थकांचं आगमन सुरू झालंय. 'इंडिया' आघाडीचे कार्यकर्ते आणि समर्थक पक्षाचे बॅनर आणि झेंडे घेऊन पाटण्यातील रस्त्यावर दिसत आहेत. गांधी मैदानावरील सभेच्या ठिकाणी इतर राज्यांतूनही आरजेडीचे नेते आणि कार्यकर्ते पोहोचले आहेत.

काय म्हणाले जयराम रमेश : पाटणा येथील रॅलीत तेजस्वी यादव, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं. ही मोठी रॅली असेल असं म्हणता येईल. पाटणा येथे नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या रॅलीबाबत ते म्हणाले की, "नितीशकुमार यांना जे काही करायचं होतं ते त्यांनी केलं. भाजपामध्ये जाण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र दुसरीकडं 'इंडिया' आघाडी मजबूत असून आमच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि द्रमुक यांच्यासोबत जागांवर चर्चा सुरू आहे.

मोदींवर विश्वास म्हणजे 'विश्वासघाताची हमी'-राहुल गांधी- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत सरकारच्या रेल्वे धोरणावरून टीका केली. त्यात म्हटले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हवाई चप्पल'च्या लोकांना विमानानं प्रवास करण्याचं स्वप्न दाखविलं. परंतु त्यांनी त्यांच्याकडून 'गरीबांची रेल्वे' हिरावून घेण्यास सुरुवात केली. दरवर्षी १० टक्के भाडेवाढ, वाढलेले रद्दीकरण शुल्क आणि महागडे प्लॅटफॉर्म तिकीट यामुळे गरीबांना रेल्वेत पायही ठेवता येत नाही. सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलती काढून घेऊन गेल्या ३ वर्षांत ३,७०० कोटी रुपये गोळा केले आहेत. एसी कोचची संख्या वाढवण्यासाठी जनरल डब्यांची संख्या कमी केली जात आहे. एसी कोचचे उत्पादनही सामान्य डब्यांच्या तुलनेत तीन पटीनं वाढले आहे. खरे तर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची परंपरा संपवणे म्हणजे हे कारभारातील चुका लपवण्याचा डाव होता. केवळ श्रीमंतांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वे धोरणे आखणं म्हणजे रेल्वेवर अवलंबून असलेल्या भारतातील ८० टक्के लोकसंख्येचा विश्वासघात करण्यासारखं आहे. मोदींवर विश्वास म्हणजे 'विश्वासघाताची हमी' आहे," अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा :

  1. राहुल गांधी यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्रकरण, नाशिकमधून एक माथेफिरू ताब्यात
  2. राहुल गांधींनी आधी काँग्रेस पक्ष सावरावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला
Last Updated : Mar 3, 2024, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details