ETV Bharat / state

तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे कमांडर; संजय राऊतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका, आयोगावर बोलताना जीभ घसरली - SANJAY RAUT SLAMS DEVENDRA FADNAVIS

शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आयोगालाही लक्ष्य केलं. बोलताना त्यांची जीभ घसरली.

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis
उबाठा खासदार संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

मुंबई : कल्याणमध्ये 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर सध्या कल्याण परिसरात तणावाचं वातावरण आहे. नागरिकांमध्ये संताप असून संबंधित आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. सध्या पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीला बुलढाणा येथून अटक केली आहे. एका बाजुला बीड आणि परभणीतल्या हत्येच्या घटना चर्चेत असतानाच आता कल्याणमधील घटनेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंवर टीका : याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "कल्याण अंबरनाथ हा उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. त्यांनी वेगळा संसार थाटल्यापासून या जिल्ह्यात महिला अत्याचार, दरोडे, लुटमार, बलात्कार, महिलांच्या हत्या, धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहेत. या भागात गुंडाना अभय दिलं जातय. तिथले खासदार मतदारसंघात फिरत ही नाही. बदलापूरच्या अक्षय शिंदे प्रकरणानंतर हे भयानक प्रकरण आहे. बलात्कार खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्ये का असतात? बदलापूरच्या प्रकरणात राजकीय फायद्यासाठी आरोपी अक्षय शिंदेचा महायुती सरकारनं एन्काऊंटर केला. आता कल्याणमध्ये चिमुकलीवर त्या गवळीनं अत्याचार केला, या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का?" असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही अर्बन नक्षलवादाचे कमांडर : पुढे बोलताना राऊत यांनी ,"बीडमधील चित्र वाईट आहे. उद्धव ठाकरे लवकरच बीड आणि परभणी या ठिकाणी जातील. बिहारचं चित्र बीड, परभणी, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये दिसत आहे. मी एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. त्यांना अर्बन नक्षलवादची फार चिंता आहे. बीडमध्ये कोण तुमचे जावई की मुलं आहेत? बीडमध्ये गेल्या काही वर्षात 38 हत्या झाल्या आहेत. या हत्या कोणाच्या झाल्या? मृत व्यक्ती कोण आहेत? आणि हत्या कोणी केल्या? याची माहिती एका व्यक्तीने दिली आहे आणि तो व्हिडिओ मी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फडणवीस आधी बीडमधील नक्षलवाद संपवा. अर्बन नक्षलवाद शब्द फडणवीस यांना आवडतो. बीडमधील अर्बन नक्षलवाद आहे. याला देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसचा पाठिंबा आहे का? देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलणं थांबवा. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर आहात. हे पद विरोधकांना संपवण्यासाठी नाही तर जनतेचं संरक्षण करा. लाडक्या बहिणींचं संरक्षण करा. त्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम तुमच्या मंत्रिमंडळात बसलेल्यांनी केलं आहे." अशी जहरी टीका केली.

हेही वाचा :

  1. बीडमधील एक आरोपी मंत्रिमंडळात; एडिट आणि क्रेडिटचा फंडा आमच्याकडे नाही, संजय राऊतांचं टीकास्त्र
  2. बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती; लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का, संजय राऊतांचा सवाल
  3. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? आता संजय राऊत म्हणतात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.