मेलबर्न Sam Konstas vs Jasprit bumrah : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पॅट कमिन्सनं 19 वर्षीय युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टंट्सला मैदानात उतरवलं. पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं फलंदाजीत कहर केला. या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध कॉन्स्टंटनं जोरदार हल्ला केला आणि भरपूर धावा केल्या. त्यानं बुमराहच्या एकाच षटकात 18 धावा दिल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक आहे. एवढंच नाही तर त्यानं बुमराहविरुद्ध दोन षटकारही ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहला षटकार मारणारा तो फक्त सातवा आणि दोन षटकार मारणारा दुसराच खेळाडू आहे.
WHAT ARE WE SEEING!
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2024
Sam Konstas just whipped Jasprit Bumrah for six 😱#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/ZuNdtCncLO
4483 चेंडूंनंतर बुमराहला षटकार : जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टंट्सनं सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही षटकांमध्येच रॅम्प शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करुन त्यानं सामन्यात कोणत्या मूडमध्ये प्रवेश केला होता हे दाखवून दिलं. पहिल्या 3 षटकांमध्ये बुमराह अपयशी ठरला तरीही कॉन्स्टंट्स थांबला नाही. डावाच्या सातव्या षटकात, त्यानं बुमराह विरुद्ध थर्ड मॅनवर रिव्हर्स शॉटद्वारे पुन्हा षटकार ठोकला. कसोटी क्रिकेटमध्ये 3 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आणि 4483 चेंडूंनंतर बुमराहविरुद्ध मारलेला हा पहिला षटकार होता. या षटकात कॉन्स्टंट्सनंही 2 चौकार मारत 14 धावा केल्या. मात्र, त्याचा हल्ला इथंच थांबला नाही.
SAM KONSTAS SMASHED 4,0,2,6,4,2 - 18 RUNS AGAINST BUMRAH IN AN OVER. 🤯 pic.twitter.com/JOj79uHmJ5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
बुमराहचं सर्वात महागडं षटक : कॉन्स्टंट्सनं या षटकात 2 चौकार लगावले आणि 14 धावा केल्या. मात्र, त्याचा हल्ला इथेच थांबला नाही. 11व्या षटकात बुमराह आला तेव्हा कॉन्स्टंट्सनं पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यानं 2 चौकार, 1 षटकार आणि दोन दुहेरीसह 18 धावा केल्या. जसप्रीत बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील हे सर्वात महागडं षटक ठरलं. आजपर्यंत त्यानं कधीच इतक्या धावा दिल्या नव्हत्या. म्हणजेच यासह कॉन्स्टंट बुमराहविरुद्धच्या कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. बुमराहनं पहिल्या स्पेलमध्ये 6 षटकं टाकली आणि 6.30 च्या इकॉनॉमीनं 38 धावा दिल्या. या मालिकेतील हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात महागडा स्पेल आहे.
FIRST SIX AGAINST BUMRAH IN TEST CRICKET AFTER 4,483 BALLS. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2024
Sam Konstas, 19 year old, on debut - part of the history. 🤯pic.twitter.com/ZTATUCje5c
पदार्पणातच अर्धशतक : सॅम कॉन्स्टंट्सनं या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण केलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा तो चौथा सर्वात तरुण खेळाडू आहे. पहिल्याच सामन्यात त्यानं शानदार खेळी खेळली आणि केवळ 52 चेंडूत 50 धावा केल्या. कॉन्स्टंट्सनं 65 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली. यानंतर रवींद्र जडेजानं त्याची विकेट घेतली. तथापि, कॉन्स्टन्सनं सांगितले की तो भविष्यातही बुमराहविरुद्ध असाच खेळत राहील.
हेही वाचा :