महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

असाही योगायोग; प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपुरातून उमेदवारी; आजच्याच दिवशी बाळू धानोरकर यांना मिळाली होती उमेदवारी - Pratibha Dhanorkar - PRATIBHA DHANORKAR

Pratibha Dhanorkar : काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असणार याबाबत जोरदार रस्सीखेच सुरू असताना, अखेर ही उमेदवारी दिवंगत बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे आजच्या दिवशीच 2019 च्या लोकसभेची तिकीट बाळू धानोरकर यांना मिळाले होते.

Pratibha Dhanorkar
प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपुरातुन उमेदवारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 10:57 PM IST

चंद्रपूर Pratibha Dhanorkar:2019 मध्ये चंद्रपूर लोकसभेवर दिवंगत बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) काँग्रेसकडून विजय मिळवला होता. मात्र 2023 मध्ये त्यांचं आकस्मिक निधन झालं होतं. यानंतर या जागेवर पोटनिवडणुक होण्याची शक्यता होती. मात्र, ही पोटनिवडणुक झाली नाही. ही जागा दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मिळणार अशी शक्यता होती. मात्र राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी या जागेवर आपला दावा सांगितला होता. त्यामुळं हा तिढा आणखीनच तीव्र झाला होता.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवार: याबाबत पक्षश्रेष्ठींनी ही जागा स्वतः विजय वडेट्टीवार यांनी लढावी अन्यथा ही जागा प्रतिभा धानोरकर यांना द्यावी हे स्पष्ट केलं. असं असतानाही बरेच पाणी पुलाखालून गेलं होतं. मात्र आज प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केला. आज अधिकृत त्यांचे नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळं धानोरकर या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असणार आहेत. राज्याचे वनमंत्री आणि भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात त्या निवडणूक लढणार आहेत.


याच दिवशी बाळू धानोरकर यांना मिळाली होती तिकीट : योगायोग म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 24 मार्चला दिवंगत खासदार आणि प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृत काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिकीट जाहीर करण्यात आली होती. धानोरकर हे 2019 मध्ये भद्रावती-वरोरा विधानसभेचे आमदार होते. त्यांनी आधीच लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी सेनेचा राजीनामा देखील देऊन टाकला होता. मात्र काँग्रेस पक्षाकडून त्यांना तिकट मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती.

काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणारे राज्यातील एकमेव खासदार: अनेक दिवस ते दिल्लीत तळ ठोकून बसले होते. त्यांच्या सोबत विजय वडेट्टीवार हे देखील होते. अशातच काँग्रेसचे विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेची तिकीट जाहीर करण्यात आली होतो. यानंतर बाळू धानोरकर थेट शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. यानंतर सूत्रे फिरली आणि हे तिकीट दिवंगत बाळू धानोरकर यांना जाहीर करण्यात आले. हा दिवस 24 मार्च 2019 होता. पुढे ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येणारे राज्यातील एकमेव खासदार ठरले. आता याच दिवशी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना 2024 ची अधिकृत उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. महादेव जानकरांचा 'रासप' महायुतीत सामील; जानकरांना कुठली एक जागा मिळणार? - Mahadev Jankar
  2. ठरलं! 'वंचित'चा स्वबळाचा नारा; प्रकाश आंबेडकर 'या' तारखेला भरणार अकोलामधून उमेदवारी अर्ज - Prakash Ambedkar
  3. विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळं राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? शिवतारे म्हणाले, "बारामतीच्या जनतेचं..." - VIJAY SHIVTARE

ABOUT THE AUTHOR

...view details