मुंबई Praful Patel on Sharad Pawar : अजित पवारांनी रा्ट्रवादीत बंड करून युती सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार 50% भाजपासोबत येण्यास अनुकुल होते, एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल पटेल यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. प्रफुल पटेल यांच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
शरद पवार यांचं प्रत्युत्तर : शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना प्रफुल पटेल यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा शरद पवार म्हणाले की, "त्यांनी जे विधान केलं, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते? मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला, असं ते म्हणाले. पण भाजपामध्ये कुणी गेलं का? तर अजिबात नाही."
प्रफुल पटेल खोटे बोलतात : "प्रफुल पटेल यांनी जो दावा केला, तो पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेणे हे सर्वांचंच कर्तव्य असतं. ते कर्तव्य शरद पवार यांनी पार पाडलं. मात्र, त्यांनी भाजपाला समर्थन दिलं नाही. तसंच भाजपासोबत जाण्याचा कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही," असं महेश तपासे म्हणाले.
महाराष्ट्र हित नव्हे :"भाजपाला समर्थन देण्याच्या संदर्भात निर्णय हा अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील आणि इतर लोकांनी घेतला. त्यामागं वैयक्तिक कारण होतं हे सर्वांना माहिती आहे. शरद पवारांचं नाव घेऊन लोकांमध्ये संभ्रम तयार करणे हे प्रफुल पटेल यांचं काम आहे. त्यांनी ते तातडीनं थांबवावं," अशी मागणी महेश तपासे यांनी केली.
हेही वाचा -
- "एक पप्पू मेरी जिंदगी में आए"; कंगना रणौतनं उद्धव ठाकरेंना डिवचलं - Kangana Ranaut on Uddhav Thackeray
- महायुतीच्या जागा वाटपाचे घोंगडे भिजतच; मात्र मनभेद नसल्याचा नेत्यांचा दावा... - Lok Sabha Election 2024
- 'शरद पवार निखारा, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'; खासदार अमोल कोल्हे - Amol Kolhe