महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले,...

BJP first list for Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलयं. यावर त्यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाचं आभार मानले आहेत. तसंच त्यांनी वाराणसीच्या जनतेला वंदन केलं.

वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले,...
वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची खास पोस्ट, म्हणाले,...

By ANI

Published : Mar 3, 2024, 8:48 AM IST

नवी दिल्लीBJP first list for Lok Sabha: भारतीय जनता पक्षानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिली यादी जाहीर केली असून, यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. 2014 आणि 2019 नंतर आता 2024 मध्येही पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. तिसऱ्यांता वाराणसीमधून तिकीट मिळाल्यानं पंतप्रधानांनी भाजपाच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

सलग तिसऱ्यांदा मिळणार संधी : पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं, "मला सलग तिसऱ्यांदा काशीतील माझ्या बंधू-भगिनींची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. भाजपाच्या नेतृत्वाचे खूप आभार. यासोबतच माझ्यावर सतत विश्वास ठेवणाऱ्या पक्षाच्या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांना मी प्रणाम करतो! मी 2014 मध्ये लोकांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि गरिबांना बळकट करण्याच्या वचनबद्धतेनं काशीला आलो. गेल्या 10 वर्षांत काशी सुधारण्याच्या दिशेनं विविध क्षेत्रात प्रगती झालीय. यापुढंही आम्ही हे प्रयत्न अधिक उत्साहानं सुरू ठेवू. काशीवासीयांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो."

पक्षाचे उमेदवार म्हणून निवड झालेल्यांचं अभिनंदन : यासोबतच शनिवारी जाहीर झालेल्या भाजपाच्या पहिल्या यादीबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "काही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही उमेदवारांच्या घोषणा केल्या जातील. पक्षाचे उमेदवार म्हणून निवड झालेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो."

मागील निवडणुकीत मोदींचा दणदणीत विजय :2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा यांनी मिळून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 6,74,664 मतं मिळाली होती. ही मते 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त होती. तसंच त्यांना 63.6 टक्के मतं मिळाली होती. सपाच्या शालिनी यादव दुसऱ्या स्थानावर होत्या. त्यांना एकूण 1,95,159 मतं मिळाली आणि मतांची टक्केवारी 18.4 टक्के होती. तर काँग्रेसचे अजय राय तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 14.38 टक्के मतांसह एकूण 1,52,548 मतं मिळाली होती. तिसऱ्यांदा निवडणूक लढविताना पंतप्रधान मोदी हे विक्रमी मतांनी निवडणून येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. भाजपाच्या पहिल्या यादीत राज्यातील एकाच नेत्यावर 'कृपा', उत्तर प्रदेशातून दिलं लोकसभेचं तिकीट
  2. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही

ABOUT THE AUTHOR

...view details