महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मोदी 3.0 : ठरलं! 9 जून रोजी नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ - NDA gov formation - NDA GOV FORMATION

NDA gov formation
NDA gov formation (Souce-IANS)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 11:51 AM IST

Updated : Jun 7, 2024, 6:57 PM IST

नवी दिल्ली-काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. त्यापूर्वी एनडीएकडून तयारी करण्यात येत आहे. एनडीएची दिल्लीत बैठक सुरू आहे. बुधवारी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी (NDA) एकमतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय नेता म्हणून निवड करणार आहेत. एनडीएने लोकसभेच्या 293 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एनडीएकडे बहुमत आहे. काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

LIVE FEED

6:56 PM, 7 Jun 2024 (IST)

9 जून रोजी नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी म्हणाले, "राष्ट्रपतींनी मला फोन केला आणि पंतप्रधानपदी नियुक्त म्हणून काम करण्यास सांगितले. त्यांनी मला शपथविधीबद्दल माहिती दिली. मी राष्ट्रपतींना सांगितले आहे की आम्ही 9 तारखेच्या संध्याकाळी शपथविधी सोहळा घेऊ." मोदी म्हणाले की, "आता राष्ट्रपती भवन उर्वरित तपशील तयार करेल आणि तोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळाची यादी राष्ट्रपतींना सुपूर्द करू. त्यानंतर शपथविधी होईल."

6:38 PM, 7 Jun 2024 (IST)

नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्या आधी नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

1:51 PM, 7 Jun 2024 (IST)

युपीएनं नाव बदलले, पण घोटाळे तेच आहेत-पंतप्रधान मोदी

१० वर्षानंतरही काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकलं नाही. इंडिया आघाडीवाले लोकांना फसवित आहेत. युपीएनं नाव बदलले, पण घोटाळे तेच आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

1:13 PM, 7 Jun 2024 (IST)

गरिबांचे कल्याण हा एनडीएच्या केंद्रस्थानी मुद्दा राहणार-काळजीवाहू पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी, शरद यादव, बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे यावेळी स्मरण केलं. "गरिबांचे कल्याण हा एनडीएच्या केंद्रस्थानी मुद्दा राहणार आहे. चांगले प्रशासन हे दहा वर्ष सुरू असल्याचे जनतेनं पाहिलं. जनतेनं अनुभवलं आहे, असं काळजीवाहू पंतप्रधान यांनी म्हटले. सर्वजण प्रयत्न करून विकसित भारताचे स्वप्न साकार करू, असा त्यांनी विश्वास विकसित करू असे म्हटले. सभागृहातील सर्वपक्षाचे खासदार हे माझ्यासाठी समान असणार आहेत.

1:09 PM, 7 Jun 2024 (IST)

देश चालविण्यासाठी सर्वमत आवश्यक-पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, " सर्वधर्मसभाव आणि घटनेसाठी समर्पित आहोत. निवडणुकीपूर्वी युती करून एनडीए सर्वात यशस्वी आहे. सरकार चालविण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. हा लोकशाहीचा सिद्धांत आहे. मात्र, देश चालविण्यासाठी सर्वमत आवश्यक आहे. ज्याप्रकारे आम्हाला बहुमत देऊन चालविण्याची संधी दिली, त्याप्रमाणं सर्वमताने सरकार चालवू, याची जनतेला ग्वाही देतो. आपली मजबूत युती हे भारताचं प्रतिबिंब आहे. तीस वर्षापासूनची युती हा मोठा संदेश आहे. ही आघाडी सर्वात यशस्वी आहे."

1:04 PM, 7 Jun 2024 (IST)

आपल्यांमध्ये विश्वास हा सेतू मजबूत आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " एवढ्या लोकांना संबोधित करण्याची संधी मिळाली आहे. विजयी झालेले अभिनंदनाचे हक्कदार आहेत. लाखो कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केले. त्यांनी परिश्रम केले. संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमधून त्यांना प्रणाम करतो.निवडणुकीत मित्रपक्षांनी खूप मेहनत घेतली. मला निवडून तुम्ही मोठी जबाबदारी दिली. त्याबद्दल आभारी आहे. मला जबाबदारीची जाणीव होत आहे. २०१९ मध्ये बोलत असताना मला नेतेपदी निवड केली होती. तेव्हा विश्वास या शब्दावर जोर दिला. आजा पुन्हा ही जबाबदारी दिली आहे. याचा आपल्यांमध्ये विश्वास हा सेतू मजबूत आहे. विश्वास ही मोठी संपत्ती आहे. हा माझ्यासाठी भावूक करणारा क्षण आहे. २२ राज्यांनी एनडीएला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली."

12:58 PM, 7 Jun 2024 (IST)

तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आंध्रप्रदेशमध्ये सत्ता मिळाली-पवनकल्याण

जनसेनेचे अध्यक्ष पवनकल्याण यांनी म्हटले, "चंद्राबाबू नायडू यांनी मोदी हे १५ वर्षे सत्तेत राहणार असल्याचे २०१४ मध्ये सांगितलं होते. हे खरे ठरले आहे. संपूर्ण भारताला तुम्ही ( नरेंद्र मोदी) प्रेरित केलं आहे. आम्हाला तुमच्यामुळे आंध्रप्रदेशमध्ये सत्ता मिळाली आहे." एनडीएच्या बैठकीत चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदाच्या प्रस्तावाला समर्थन दिलं.

12:47 PM, 7 Jun 2024 (IST)

शिवसेना आणि भाजपा ही बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून फेविकॉल सारखी मजबुत युती-एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राजनाथ सिंहांच्या प्रस्तावाला आमचे विधान आहे. लोकांना भ्रमित करण्याचं आणि अफवा पसरविण्याचं काम विरोधकांकडून करण्यात आलं. त्यांना जनतेनं नाकारलं आहे. नवीन खासदारांचे अभिनंदन केलं आहे. शिवसेना आणि भाजपा समविचारी पक्ष आहेत. शिवसेना आणि भाजपा ही बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून फेविकॉल सारखी मजबुत युती आहे. मोदींची जादू सलग तिसऱ्यांदा जनतेनं पाहिली आहे. शिवसेना पक्षाकडून त्यांचं स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत. मी मिटनेवाला नाम नही, तुम कबतक रोकोगे, अशी कविता यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हणत मोदींचे अभिनंदन केले. लोकांनी विकासाला महत्त्व दिलं आहे. विरोधकांनी केवळ राजकारण केले. त्यांना घरी बसविण्यात आले आहे." अजित पवार म्हणाले, आम्ही पंतप्रधान यांच्या नावाला अनुमोदन देत आहोत, धन्यवाद.

12:20 PM, 7 Jun 2024 (IST)

एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड

एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला काळजीवाहू गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अनुमोदन देण्यात आलं. एनडीएकडून आजच सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाऊ शकतो.

12:19 PM, 7 Jun 2024 (IST)

पंतप्रधान मोदींमुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत-राजनाथ सिंह

काळजीवाहू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव देण्यात आला. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, " पंतप्रधान मोदींमुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. गेल्या दहा वर्षात दिशा आणि दशा बदलली आहे. देशात क्रांतिकारी परिवर्तन झाले.त्यांची नेतपदी निवड योग्य आहे."

12:08 PM, 7 Jun 2024 (IST)

एनडीएच्या संसदीय बैठकीत नवनिर्वाचित खासदारांकडून 'मोदी-मोदी'च्या घोषणा

नवी दिल्ली: एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एनडीए नेत्यांनी स्वागत स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संसदेमध्ये भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी पोहोचताना आदरपूर्वक भारतीय राज्यघटनेला वंदन केलं.

11:53 AM, 7 Jun 2024 (IST)

नितीन गडकरी एनडीएच्या बैठकीला उपस्थित

एनडीएच्या बैठकीला नागपूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले नितीन गडकरी उपस्थित आहेत.

11:53 AM, 7 Jun 2024 (IST)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार एनडीएच्या बैठकीला उपस्थित

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

Last Updated : Jun 7, 2024, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details