मुंबई Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. 48 मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यात मतदान झालं होतं. त्याचे निकाल आता हाती आले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली होती. बारामती, पुणे, सातारा, अमरावती, बीड, अहमदनगर, ठाणे, नाशिक अशा प्रतिष्ठित मतदारसंघांवर सध्या देशाचं लक्ष लागलं आहे. तर मुंबईतील साह तमदारसंघाकडंही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
LIVE FEED
10:15 PM, 4 Jun 2024 (IST)
फेरमतमोजणीनंतर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव
फेरमतमोजणीनंतर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे.
जिल्हा निवडणूक विभागाकडून 32 व्या फेरीची अधिकृत आकडेवारी जाहीर
पंकजा मुंडे - 674984
बजरंग सोनवणे - 681569
यामध्ये बजरंग सोनवणे 6128 मतांनी आघाडीवर होते.
एकूण 32 फेऱ्या पुर्ण जिल्हा निवडणूक विभागाकडून फेऱ्यांची अधिकृत माहिती
9:57 PM, 4 Jun 2024 (IST)
फेरमतमोजणीची एक फेरी बाकी
बीड जिल्हा निवडणूक विभागाकडून 31 व्या फेरीची अधिकृत आकडेवारी जाहीर
पंकजा मुंडे - 674028
बजरंग सोनवणे - 680156
यामध्ये बजरंग सोनवणे 6128 मतांनी आघाडीवर आहेत
दरम्यान एकूण 32 फेऱ्यापैकी जिल्हा निवडणूक विभागाकडून 31 फेऱ्यांची अधिकृत माहिती देण्यात आली असून अद्याप 1 फेरी बाकी आहेत
9:44 PM, 4 Jun 2024 (IST)
केवळ 48 मतांनी रवींद्र वायकर विजयी
केवळ 48 मतांनी रवींद्र वायकर विजयी
निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती -
26 फेऱ्या आणि टपाली मात्र पत्रिका निर्णय
Invalid Postal Votes चे verification आपण केलं आहे
अमोल गजानन किर्तीकर: 4 लाख 52 हजार 596
रवींद्र वायकर: 4 लाख 52 हजार 644
48 मतांनी वायकर विजयी
8:29 PM, 4 Jun 2024 (IST)
बीडमध्ये मतमोजणी प्रक्रिया शांततेत
बीडमध्ये मतमोजणी प्रक्रिया शांततेत सुरू आहे. गोळीबार, मारामारी ही केवळ अफवा आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. बीड लोकसभा मतदार संघात मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. गोळीबार व मारामारी ही केवळ अफवा असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
7:59 PM, 4 Jun 2024 (IST)
बीडमध्ये बजरंग सोनावणे आघाडीवर; फेरमतमोजणी करण्याची पंकजा मुंडेंची मागणी
बीडमध्ये बजरंग सोनावणे हे आघाडीवर आहेत. मात्र, बीड आणि गेवराई येथील फेरमतमोजणी करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
6:44 PM, 4 Jun 2024 (IST)
साताऱ्यात उदयनराजे भोसले विजयी
साताऱ्यात उदयनराजेंनी फुलवलं कमळ!
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदेंचा 32,274 मतांनी केला पराभव
उदयनराजे भोसलेंना मिळालेली मते - ५,६८,७४९
शशिकांत शिंदेंना मिळालेली मते - ५,३६,४७५
5:57 PM, 4 Jun 2024 (IST)
नरेश म्हस्के तब्बल अडीच लाख मतांनी विजयी
नरेश म्हस्के यांना एकूण 7 लाख 31 हजार 927 मत
तर राजन विचारे यांना एकूण 5 लाख 15 हजार 876 मत
2 लाख 51 हजार 16 पेक्षा जास्त मतांना म्हस्के विजयी
5:14 PM, 4 Jun 2024 (IST)
श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, बाळ्या मामांना निर्णयाक आघाडी
ठाणे लोकसभा
नरेश म्हस्के : 654895
राजन विचारे : 469298
लीड : 185597 (नरेश म्हस्के)
कल्याण लोकसभा
श्रीकांत शिंदे : 526264
वैशाली दरेकर : 285891
लीड : 240373 (श्रीकांत शिंदे)
भिवंडी लोकसभा
बाळ्या मामा म्हात्रे : 383845
कपिल पाटील : 312967
निलेश सांभरे : 167511
लीड : 70878 (बाळ्या मामा)
4:48 PM, 4 Jun 2024 (IST)
बुलढाण्यात महायुतीचे प्रतापराव जाधव यांचा विजयाचा चौकार
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा नरेंद्र खेडेकर यांचा वीस हजाराच्या जवळपास मतांनी जाधवांनी पराभव केला असून, मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, अधिकृत विजयाच्या घोषणेपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहुयात
4:19 PM, 4 Jun 2024 (IST)
27 फेरीत 159032 मतांनी काँग्रसचे गोवाल पाडवी विजयी
नंदुरबार लोकसभा
27 फेरी अंती
काँग्रेस :- गोवाल पाडवी :- 744879
भाजप :- डॉक्टर हिना गावित :-585847
27 फेरीत 159032 मतांनी काँग्रसचे गोवाल पाडवी विजयी
4:16 PM, 4 Jun 2024 (IST)
श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक होण्याची चिन्हे
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये त्यांना एक लाख दोन हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मतमोजणीच्या अजून काही फेऱ्या शिल्लक असल्या तरी बारणे यांच्या हॅट्रिकवर मात्र शिक्कामोर्तब झाला आहे. मावळ लोकसभा मतदार संघासाठी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच खासदार श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली आहे.
3:45 PM, 4 Jun 2024 (IST)
जेव्हा नेते आम्हाला धमक्या देत होते तेव्हा जनतेने आम्हाला साथ दिली - रोहित पवार
रोहित पवार यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्रातील जनतेने खूप चांगला प्रतिसाद आणि कौल दिला आहे
पुढच्या दोन-तीन दिवसांमध्ये वेगळं समीकरण पाहायला मिळेल
भाजपा सत्तेत येणार नाही असे आम्हाला वाटते
जेव्हा नेते आम्हाला धमक्या देतं होते तेव्हा जनतेने आम्हाला साथ दिली
महाराष्ट्र देशात परत १ नंबरला येणार
जे लोक चुकीने गेले त्यांच्याबद्दल विचार करावा
बाकी लोकांना घेण्याबाबत योग्य विचार. करावा
वंचित सोबत आली असती तर फायदा झाला असता
२०१९ ची परिस्थिती नव्हती
विधानसभेत जागा आम्ही जास्तं लढवू
आघाडीतील नेत्यांशी एकत्र बसून चर्चा करू
समविचारी.नेत्यांमुळे विजय
3:21 PM, 4 Jun 2024 (IST)
मंदिर, मस्जिद करून फायदा होत नाही, निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यांची पत्रकार परिषद
अनेक चांगल्या गोष्टी यावेळी घडल्या
सर्व मिळून आम्ही १० जागा लढवल्या. ७ जागांवर विजयी
हे फक्त राष्ट्रवादीचे नाही तर आघाडीचे यश
ठाकरे, काँग्रेस आणि सर्व मिळून लढलो
आम्ही तिघे एकत्र राहून राज्याची सेवा करू
मी काही कुणाशी बोललो.नाही...काँग्रेसच्या लोकांशी बोललो फक्त
नितीश कुमार यांच्याशी बोलणे नाही
याच्यापेक्षा वेगळा निकाल बारामती मध्ये अपेक्षित नव्हता
लोकांची मानसिकता मला माहिती आहे. लोकं योग्य निर्णय घेतात
खडकवासला वगळता अन्य ठिकाणी. चांगले मतदान
हा निकाल प्रेरणाद्यी आहे
मंदिर, मस्जिद करून फायदा होत नाही
2:59 PM, 4 Jun 2024 (IST)
जळगावमधून भाजपाच्या स्मिता वाघ विजयी
जळगाव मतदार संघात भाजपाच्या स्मिता वाघ विजयी झा्ल्या आहेत. जवळपास दोन लाख मतांनी त्या आघाडीवर होत्या. ही आघाडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या विजयाची औपचारिकता बाकी आहे.
2:10 PM, 4 Jun 2024 (IST)
शिर्डीत शिवसेनेकडून शिवसेनेचा पराभव
शिर्डी लोकसभेचा निकाल अखेर जाहीर झालाय. ठाकरे गटाचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांना साईबाबा पावले आहेत, असंच म्हणावं लागेल. शिर्डीत शिवसेनेच्या उमेदवारानं शिवसेनेचाच उमेदवार पाडला, अशीही चर्चा सुरू झाली. येथून शिंदे गटाचे नेते सदाशिव लोखंडे यांचा पराभव झालाय.
1:35 PM, 4 Jun 2024 (IST)
चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
महाराष्ट्रातील प्राथमिक कल पाहून भाजपामध्ये अस्वस्थता
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल
महाविकास आघाडीची राज्यात मुसंडी
1:31 PM, 4 Jun 2024 (IST)
विदर्भात महायुतीला मोठा धक्का
विदर्भात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीला केवळ तीन जागांवर आघाडी मिळाली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे हे आघाडीवर आहेत. उज्ज्वल निकमसुद्धा आघाडीवर आहेत. पियूष गोयलसुद्धा आघाडीवर आहेत. रवींद्र वायकर हेदेखील आघाडीवर आहेत.
12:53 PM, 4 Jun 2024 (IST)
पंकजा मुंडे, नवनीत राणा आघाडीवर तर रावसाहेब दानवे पिछाडीवर
कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?
उज्जवल निकम - आघाडीवर
पंकजा मुंडे - आघाडीवर
भारती पवार - पिछाडीवर
सुजय विखे - आघाडीवर
अभय पाटील - आघाडीवर
उदयनराजे भोसले - आघाडीवर
मुरलीधर मोहोळ - आघाडीवर
अमोल कोल्हे - आघाडीवर
नवनीत राणा - आघाडीवर
सुप्रिया सुळे - आघाडीवर
नारायण राणे - आघाडीवर
सुनील तटकरे - आघाडीवर
स्मिता वाघ - आघाडीवर
रक्षा खडसे - आघाडीवर
संजय जाधव - आघाडीवर
कल्याण काळे - आघाडीवर, रावसाहेब दानवे - पिछाडीवर
12:37 PM, 4 Jun 2024 (IST)
भाजपा 13, ठाकरे गट 10 तर अजित पवार गटाला केवळ एका जागेवर आघाडी
महाराष्ट्रात सध्या भाजपा 13 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 10 जागांवर, काँग्रेस 9, शरद पवार गट 8 तर शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर अजित पवारांच्या गटाला केवळ एका जागेवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळं महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. तर महाविकास आघाडीनं चांगलं कमबॅक केलं असल्याचं दिसून येत आहे.
12:01 PM, 4 Jun 2024 (IST)
बड्या नेत्यांना जोरदार धक्का
कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?
नारायण राणे - आघाडीवर
संदिपाम भुमरे - आघाडीवर
सुजय विखे - आघाडीवर
नवनीत राणा - पिछाडीवर, बळवंत वानखेडे - आघाडीवर
सुप्रिया सुळे - आघाडीवर
पंकजा मुंडे - पिछाडीवर, बजरंग सोनावणे - आघाडीवर
नितीन गडकरी - आघाडीवर
धैर्येशिल मोहिते पाटील - आघाडीवर
शाहू महाराज - आघाडीवर
उदयनराजे भोसले - पिछाडीवर, शशिकांत शिंदे - आघाडीवर
विशाल पाटील - आघाडीवर
11:50 AM, 4 Jun 2024 (IST)
नरेंद्र मोदी पिछाडीवर होते हे भाजपाचं अपयश; विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई Lok Sabha Election Results 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हाच देशाचा कल आहे. उत्तरप्रदेशचा कल हा केवळ त्या राज्याचा कल नसून, संपूर्ण देशाचा कल आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाला देशभरात १५० जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत कँग्रेसला ५० जागा देखील मिळाल्या नव्हत्या. कँग्रेस १५० जागांपर्यंत पोहचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ होण निश्चित आहे, असंही राऊत म्हणाले.
11:08 AM, 4 Jun 2024 (IST)
बारामतीत अजित पवारांना मोठा दणका; सुप्रिया सुळे आघाडीवर
मुरलीधर मोहोळ २१ हजार मतांनी आघाडीवर
सुप्रिया सुळे १४ हजार मतांनी आघाडीवर
शिरूर मतमोजणी केंद्र...
- पहिली फेरी एकूण नोटा - 366
- दुसरी फेरी एकूण नोटा - 2128
- तिसरी फेरी एकूण नोटा - 1117
- चौथी फेरी एकूण नोटा - 354
- पाचवी फेरी नोटा - 2033
10:38 AM, 4 Jun 2024 (IST)
सगळ्यात जास्त मताधिक्यानं ताई आघाडीवर - युगेंद्र पवार
आत्ता काही फेऱ्या झाल्या आहेत. लगेच काही सांगता येणार नाही. ताई लीडमध्ये आहेत याचा आम्हाला आनंद आहे. सगळ्या ठिकाणाहून आम्ही पुढे आहोत. बारामतीमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य आहे. जनतेने कष्ट केले आणि त्यामुळे विश्वास आहे.
10:18 AM, 4 Jun 2024 (IST)
महाविकास आघाडीला 25 जागांची आघाडी
राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतीला 21 जागांवर आघाडी आहे तर महाविकास आघाडी 25 जागांवर आघाडी आहे. उज्ज्वल निकम, इम्तियाज जलील, सुप्रिया सुळे, नरेश म्हस्के, शाहू महाराज, अमोल कोल्हे, सुजय विखे, भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर आहेत.
10:05 AM, 4 Jun 2024 (IST)
राज्यातील 48 जागांचे कल आले हाती; महायुतीला मोठा धक्का, भाजपा 14 तर ठाकरे गटाला 11 जागांवर आघाडी
राज्यातील 48 जागांचे कल सध्या हाती आले आहेत. यात भाजपाला 14 जागा, शिवसेनेला 6 तर अजित पवार यांना एका जागेवर आघाडी आहे. तर ठाकरे गटाला 11, शरद पवार गटाला 6 तर काँग्रेसला 8 जागांवर आघाडी मिळाली आहे.
9:33 AM, 4 Jun 2024 (IST)
ठाण्यातून नरेश म्हस्के, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ आघाडीवर
ठाण्यातून नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. तर बारामतीतून सुप्रिया सुळे, तर शिरुरमधून अमोल कोल्हे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत.
9:16 AM, 4 Jun 2024 (IST)
रायगडमध्ये सुनील तटकरे आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर
रायगड - पोस्टल मतमोजणीत सुनील तटकरे आघाडीवर. अलिबागच्या नेहूली क्रीडासंकुलमध्ये मतमोजणी सुरु आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे. अटीतटीची लढत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीकडून तर माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते महाविकास आघाडीकडून लढत आहेत. एकूण झालेले मतदान 10 लाख 9 हजार म्हणजेच 60.41% आहे.
9:09 AM, 4 Jun 2024 (IST)
निकालाआधीच गोव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
गोव्यातील दोन लोकसभा जागांच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मतमोजणीपूर्वी सकाळी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे एकच तारांबळ उडाली. दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे.
8:50 AM, 4 Jun 2024 (IST)
मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल आघाडीवर
मुंबई उत्तरमधून भाजपाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आघाडीवर आहेत.
8:48 AM, 4 Jun 2024 (IST)
गोरेगाव नेस्को सेंटर येथील मीडिया सेंटरमध्ये आयोगाचं ढिसाळ नियोजन
गोरेगाव नेस्को सेंटर येथील मीडिया सेंटरमध्ये आयोगाचं ढिसाळ नियोजन दिसून आले. मतमोजणीची आकडेवारी अद्यापही अधिकृतरित्या स्क्रीनवर जाहीर नाही. स्क्रीनिंग संदर्भात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडून सारवासारव करण्यात आली.
8:36 AM, 4 Jun 2024 (IST)
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ मतमोजणीचे ८४ टेबल
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ एका विधानसभा मतदारसंघात एकूण टेबल १४ आहेत. तर सर्व विधान सभेचे एकूण ८४ टेबल आहेत. एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. ठाण्यात 1218, भिवंडीत 788, कल्याणमध्ये 633 पोस्टल मतदान आहे.
8:36 AM, 4 Jun 2024 (IST)
सांगली लोकसभेच्या मतमोजणीला 25 मिनिट उशिराने सुरुवात
सांगली लोकसभेच्या मतमोजणीला 25 मिनिट उशिराने सुरुवात झाली आहे. . 6 मतदार संघात 14 टेबलवर मतमोजणीला झाली सुरुवात झाली आहे.
8:34 AM, 4 Jun 2024 (IST)
शिवडी येथे पोस्ट बॅलेट मतमोजणीला सुरुवात
शिवडी येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलेट मतांची मतमोजणी केली जात आहे. दक्षिण मध्य मुंबईत 4534 पोस्टल बॅलेट प्राप्त झाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पोस्टल बॅलेट आकडेवारी जाहीर होणार आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात शिवडी येथे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीला सुरुवात.
8:24 AM, 4 Jun 2024 (IST)
पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आणि मुरलधीर मोहोळ आघाडीवर
पोस्टल मतदानामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघांमधून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. पुण्यात एकूण 703 पोस्टल मते आहेत.
8:24 AM, 4 Jun 2024 (IST)
कोल्हापुरात शाहू महाराज आघाडीवर
कोल्हापूर लोकसभेचा पहिला कल हाती आला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना मताधिक्य मिळाले आहे.
7:59 AM, 4 Jun 2024 (IST)
मतमोजणी केंद्रावर माध्यमांना नाकारला प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याचा दावा
चंद्रपूर- मतमोजणी केंद्रावर माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. कॅमेरा किंवा बॅग प्रवेशद्वाराच्या आत नेण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रापासून दूर असलेल्या प्रवेशद्वारावर सर्व माध्यम प्रतिनिधींना थांबवण्यात आले असून इथून wkt करण्यासही मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी हे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. असा प्रकार पहिल्यांदाच होत असल्याने माध्यमांनी बहिष्कार घालायची भूमिका घेतली आहे.
7:55 AM, 4 Jun 2024 (IST)
पालघर लोकसभेत 3 हजार 516 पोस्टल मतदान, थोड्याच वेळात मतदान सुरू होणार
पालघर लोकसभेत एकूण मतदार 21 लाख 48 हजार 514 आहेत. यापैकी 13 लाख 73 हजार 162 मतदारांनी मतदान केले आहे. यामधे पोस्टल मतदान 3 हजार 516 आहे. पालघर लोकसभेसाठी एकूण 63.91% मतदान झाले आहे
7:51 AM, 4 Jun 2024 (IST)
नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाला. उमेदवारांच्या प्रतिनिधीनं ईव्हीएम मशीनची माहिती आणि मतमोजणीसाठी काही कागदपत्रे आत सोबत नेण्याचा प्रयत्न केला. उमेदवाराच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली.
7:28 AM, 4 Jun 2024 (IST)
सांगली लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार, अंतिम निकाल 5 वाजेपर्यंत येण्याची शक्यता
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. सहा विधानसभा मतदार संघानिहाय मतमोजणी एकाच वेळी होणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. साडेआठ वाजता प्रत्यक्षात ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होणार होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. काही टेबलांवर 22 तर काही टेबलांवर 25 फेऱ्या होणार आहेत. अंतिम निकाल 5 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे.
7:25 AM, 4 Jun 2024 (IST)
बारामती लोकसभेतील मतमोजणी केंद्रावर काटेकोर तपासणी सुरू, मोबाईल आणण्यास मनाई
बारामती लोकसभेतील मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. मतदान केंद्रावर बॅग आणि मोबाईलमध्ये आण्यास मनाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षांचे पक्षाचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईलआत मध्ये आणण्यास मनाई करण्यात आली आहे. एका व्यक्तीने सॉक्समध्ये मोबाईल ठेवला होता. पोलिसांनी बूट आणि सॉक्स तपासून त्याला मोबाईल नेण्यास मनाई केली आहे.
7:22 AM, 4 Jun 2024 (IST)
अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल- बळवंत वानखडे
अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या चुरशीची लढत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान झाले. आज मतमोजणी आहे. नेमकं कोण विजयी होणार याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. हा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूनेच लागणार आणि काँग्रेसच विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससह सर्वच मित्रपक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रत्येकाने निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. त्यामुळे एक्झिट पोल काही जरी येत असले तरी अमरावती लोकसभा मतदारसंघात आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा विजय होईल, याची मला पूर्ण खात्री असल्याचे बळवंत वानखडे म्हणाले.