ETV Bharat / politics

राज्यातील जनतेनं दडपशाहीला नाकारले आहे-सुप्रिया सुळे - INDIA bloc Vs NDA - INDIA BLOC VS NDA

INDIA bloc Vs NDA
INDIA bloc Vs NDA (Source- ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 8:23 AM IST

Updated : Jun 6, 2024, 1:23 PM IST

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून ८ जूनला शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भूतानचे राजा, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि नेपाळ, बांगलादेश, मॉरिशससह विविध देशांच्या पंतप्रधानांसह अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रणे पाठवली आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी फोनवरून पंतप्रधान मोदींचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.

LIVE FEED

1:22 PM, 6 Jun 2024 (IST)

राज्यात महागाई आणि बेरोजगारीचे संकट-सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या जंगी स्वागतानंतर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, "राज्यात महागाई आणि बेरोजगारीचे संकट आहे. राज्यातील जनतेनं दडपशाहीला नाकारले आहे. माझ्या स्वागतासाठीचे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी द्या. बारामतीचा विजय हा मतदारांचा आहे. आता आमची जबाबदारी वाढली आहे."

12:11 PM, 6 Jun 2024 (IST)

सुप्रिया सुळे यांचे ढोल-ताशे वाजवून पुण्यात स्वागत

सुप्रिया सुळे यांच्या बारामतीमधील विजयानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सुप्रिया सुळे पुण्यात आल्यानंतर ढोल-ताशे वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

12:09 PM, 6 Jun 2024 (IST)

अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक सुरू, हे नेते राहिले उपस्थित

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला अनेक प्रमुख नेते उपस्थित राहिले आहेत. ही बैठक पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरे आणि रामराजे नाईक निंबाळकर आणि इतर नेते उपस्थित राहिले आहेत.

10:42 AM, 6 Jun 2024 (IST)

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींची आज घेणार भेट, 'हे' आहे कारण

18 व्या लोकसभेच्या स्थापनेची सुरुवात करण्यासाठी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. नवनिर्वाचित खासदारांची (खासदार) सर्वसमावेशक यादी सादर करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणार आहेत.

10:39 AM, 6 Jun 2024 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक, अजित पवार पक्षाच्या कामगिरीचा घेणार आढावा

राष्ट्रवादी काँग्रेसची आज सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार हा लोकसभेतील पक्षाच्या कामगिरीची आढावा घेण्याची शक्यता आहे.

9:43 AM, 6 Jun 2024 (IST)

पंतप्रधान मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही, आरएसएससह भाजपामधून विरोध-संजय राऊत

नवी दिल्ली- देवेंद्र फडणवीसांनी न्यायमूर्तींना धमक्या देण्याचं काम केले. त्यांच फडतूस राजकारण पटले नाही. विदर्भात फडणवीसांनी भाजपाला रसातळाला नेले. पोलिसांचा राजकीय कामासाठी वापर करण्यात आला. फडणवीस यांनी चुकीच्या पद्धतीनं राजकारण केले. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. खासदार राऊत म्हणाले, फडणवीस यांनी न्यायमूर्तींना घरी बोलावून दम दिला. त्यांनी राजकारणातील एक पिढी संपविण्याचे काम केले. जे २ पक्ष फोडले त्यांनीच फडणवीस यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली. तेवढाच लोकांचा राग मोदी-शाह यांच्यावर आहे.

पंतप्रधान मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. त्यांना संघाचा आणि भाजपामधून विरोध आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बहुमत मिळाले नाही. कुबड्या घेऊन विजयाचा जल्लोष करत आहेत. जनतेला मूर्ख समजत आहेत का? मोदींनी बळजबरीनं सरकार स्थापन करण्याला विरोध आहे. आमच्यासारखी असंख्य लोक लोकशाहीसाठी मरण्यासाठी तयार आहेत. राष्ट्रीय संघामधील प्रमुख नेते हे पर्यायाची चाचपणी करत आहेत. मोदी-शाह यांनी पाशवी मते मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता संघ आता त्यांना घरी पाठवू शकते.

9:27 AM, 6 Jun 2024 (IST)

लोकसभा निवडणुकीचा नाद खुळा! 1121 पैकी 1025 उमेदवारांनी गमाविलं डिपॉझिट

मुंबई- महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेल्या 1,121 उमेदवारांपैकी तब्बल 1,025 उमेदवारांनी अनामत रक्कम (डिपॉझिट) गमाविलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सर्वात कमी मतदारांनी डिपॉझिट गमाविलं आहे. मतदारसंघात सात उमेदवारांनी डिपॉझिट गमविले. तर बीडमध्ये सर्वाधिक 39 उमदेवारांनी डिपॉझिट गमाविलं आहे. बारामतीत 36 आणि अमरावतीमध्ये 35 उमेदवारांनी डिपॉझिट गमाविलं आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीतील सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25,000 रुपये आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी 12,500 रुपये डिपॉझिट घेण्यात येते.

8:53 AM, 6 Jun 2024 (IST)

भाजपाची शुक्रवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा घेण्यात येणार आढावा

नवी दिल्ली- भाजपासह आणि एनडीएच्या खासदारांची शुक्रवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक आहे. भाजपानं पक्षाचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवारी महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीत बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला भाजपाचे पदाधिकारी आणि नेतेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 7 जून रोजी भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठकदेखील होऊ शकते. यामध्ये भाजपाचे सर्व खासदार एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करणार आहेत.

8:50 AM, 6 Jun 2024 (IST)

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून लोकसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी द्विराष्ट्रीय संबंध अधिक व्यापक आणि दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला.

8:48 AM, 6 Jun 2024 (IST)

रशियाचे राष्टाध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन

लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही बुधवारी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलून विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी पुतीन यांनी भारतासोबतच्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीला रशियाकडून महत्त्व देण्यात येत असल्याचे सांगितलं. नवीन सरकारमध्ये चांगले यश, चांगले आरोग्य आणि समृद्धीसाठी मनापासून शुभेच्छा देत असल्याचं पुतीन यांनी म्हटलं.

Last Updated : Jun 6, 2024, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.