उत्तर प्रदेशातील हाथरसमधील चेंगराचंगरीच्या घटनेत आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये 19 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. अजूनही अनेक जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.
हाथरसमधील चेंगराचंगरीच्या घटनेत आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू - Breaking News Today
Published : Jul 2, 2024, 7:39 AM IST
|Updated : Jul 2, 2024, 5:11 PM IST
राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते.
ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक
LIVE FEED
हाथरसमधील चेंगराचंगरीच्या घटनेत आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू
मोदींची सबका साथ सब का विकासची पुन्हा साद, विरोधकांची मणिपूरवरुन घोषणाबाजी
नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा घातली सबका साथ सबका विकासची साद. देशाची अर्थव्यवस्था सुधारल्याचा केला दावा. आता भारताची स्पर्धा स्वतःशीच असल्याचं मत केलं व्यक्त. मोदींचं भाषण सुरू असताना विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी. आधी मणिपूरला न्याय द्या अशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी.
हाथरसमध्ये चेंगराचेंगरी, ३५ ठार झाल्याची भीती
उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये सत्संगसाठी आलेल्या लोकांची चेंगराचेंगरी. ३० ते ३५ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
भाषणातील भाग काढून टाकणं संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे-राहुल गांधींचं ओम बिर्लांना पत्र
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील टिप्पणी आणि काही भाग काढून टाकण्यात आला. त्यामुळे नाराज झालेल्या विरोधी पक्षनेत्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत अशी विनंती केली. त्यांनी पत्रात म्हटले, "माझ्या भाषणातील बराचसा भाग कामकाजातून काढून टाकण्यात आल्यानं मला धक्का बसला आहे. हे संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे."
विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, वरिष्ठ नेत्यांचं मानले आभार
पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंकजा मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, " लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देऊनही मला काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मला संधी दिल्याबद्दल मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानते. "
विधान परिषदेचे कामकाज १ तासासाठी तहकूब, अंबादास दानवेंच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी आक्रमक
भाजपा आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील शाब्दिक वादाचे सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात पडसाद उमटले आहे. अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा, अशी सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेत मागणी लावून धरली. सभागृहातील गोंधळानंतर विधान परिषदेचे कामकाज १ तासासाठी तहकूब करण्यात आले.
मुंबई शेअर बाजारात आज तेजी, सर्वोच्च निर्देशांकाच्या नोंदीनंतर गुंतवणुकदारांमध्ये उत्साह
मुंबई शेअर बाजारात आज तेजी असल्यानं गुंतवणुकदारांमध्ये उत्साह आहे. शेअर बाजारा खुला होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 79,855 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा 24,236 वर पोहोचला. सर्वाधिक आयटी कंपन्यांच्या शेअरची मागणी वाढली आहे. यामध्ये विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा या आयटी कंपन्यांचा समावेश आहे.
ठाण्यात पोलीस भरती परीक्षेदरम्यान उत्तेजक द्रव्यांचा वापर, 4 जणांवर गुन्हा दाखल
ठाणे- पोलीस भरतीत उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत आहेत. तर काही तरुण बेकायदेशीर पद्धतींचा वापर करत आहेत. ठाणे जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीकरिता आलेल्या तरुणांनी उत्तेजक द्रव्ये वापरण्याचा प्रयत्न केला. या चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
आई-बहिणीला शिवी दिल्यानं अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा-प्रसाद लाड यांची मागणी
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्याविरोधात भाजपाचे आमदार आणि प्रतोद प्रसाद लाड आक्रमक झाले. ते म्हणाले, " " विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा. कारण त्यांनी काल माझ्या आई आणि बहिणीला उद्देशून अपमानास्पद शब्द वापरले. या घटनेबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे."
नेरिटिव्ह सेट करून दुसऱ्याकडं बोट दाखविले जाते-विजय वडेट्टीवार
"भाजपानं हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही. आम्ही राज्यघटना वाचवत आहोत. हिंसा ही हिंदु धर्माची संस्कृती नाही, असे राहुल गांधी म्हणाले. नेरिटिव्ह सेट करून दुसऱ्याकडं बोट दाखविले जाते," असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी विरोधकांकडून चुकीचे नेरिटव्ह केले जात असल्याचा आरोप केला होता.
हुतात्मा झालेल्या अग्नीवीरला सरकारकडून 1.08 कोटी रुपयांची मदत, नातेवाईकांनी दिली माहिती
बुलढाणा - कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या बुलढाण्यातील अग्निवीरच्या कुटुंबाला केंद्र सरकारकडून 1.08 कोटी रुपयांची मदत मिळाली. ही माहिती हुतात्मा झालेल्या जवानाच्या नातेवाईकांनी दिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निपथ योजनेतेून जवानांना लाभ मिळत नसल्याचा आरोप केला होता
नागपुरात मर्सिडीज अपघात प्रकरणात महिला चालकाने पोलिसांसमोर शरण
नागपूर- नागपूर शहरात चार महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत मर्सिडीज कार चालवून दोघांना उडविणाऱ्या महिला चालकाला अटक करण्यात आली. रितिका उर्फ रितू मालू असे महिला चालकाचे नाव आहे. तिने सोमवारी शहर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या महिलेला अटकपूर्व जामीन नाकारला.
विधिमंडळ अधिवेशनात वातावरण तापलं..सत्ताधारी आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
सत्ताधाऱ्यांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवीगाळप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करावे, अशी मागणी करत आंदोलन सुरू केले. सत्ताधारी आमदारांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या हस्ते दिल्लीत 3 न्यायालयांच्या इमारतीची पायाभरणी
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज 3 न्यायालयांच्या इमारतीची पायाभरणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सरन्यायाधीश चंद्रचुड म्हणाले, " हा पायाभरणी समारंभ नागरिकांसाठी, दिल्लीतील रहिवाशांसाठी आणि न्यायाच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या मजबूत असलेल्या इमारतीमधून न्यायाधीश, वकील आणि सर्व याचिकाकर्त्यांसाठी पुरेशा सुविधा मिळतील, अशी आहे."
राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपा काय देणार उत्तर? रणनीती आखण्याकरिता थोड्याच वेळात एनडीएची बैठक
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याकरिता एनडीए आज रणनीती आखणार आहे. पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींच्या टीकेला आज सायंकाळी उत्तर देणार आहेत. त्यापूर्वी एनडीएची आज बैठक होणार आहे.
इरान्ना कोंगुलवारच्या घरात पेपरफुटीचे धागेदोरे सापडणार? सीबीआयचे अधिकारी आज घेणार घराची झडती
सीबीआयचे अधिकारी नीट पेपरफुटीतील आरोपी इरान्ना कोंगुलवारच्या लातूरातील घराची झडती घेणार आहेत. पेपर फुटीतील आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
लग्नास नकार दिल्यानं महिलेनं प्रियकराचे कापले प्रायव्हेट पार्ट
बिहारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सारण येथे एका महिलेनं तिच्या प्रियकराचे प्रायव्हेट पार्ट कापले. प्रियकरानं लग्नास नकार दिल्यानं महिलेनं हे पाऊल उचलले. जखमी व्यक्तीला पाटणा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे सारण पोलिसांनी सांगितले.
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे विजयी
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार संदीप गुळवे यांचा पराभव केला. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना संदीप गुळवे यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
हिंदूंना हिंसक म्हटल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी-देवेंद्र फडणवीस
पुणे- लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाजपाला हिंसक म्हटल्याचे राज्यात पडसाद उमटले आहेत. हिंदूंना हिंसक म्हटल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. देशात वाढणाऱ्या धार्मिक विद्वेषावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिल्याच भाषणात भाजपावर जोरदार हल्ला केला. यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, "राहुल गांधींनी संपूर्ण हिंदू समाजाबद्दल चुकीचे, आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. लोकसभेत संपूर्ण समुदायाला हिंसक म्हणणे हा हिंदूंचा अपमान आहे. त्यांनी शब्द परत घेऊन माफी मागावी."