ETV Bharat / politics

विधान परिषद निकाल : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर विजयी - Maharashtra Breaking news - MAHARASHTRA BREAKING NEWS

Maharashtra Breaking news live
Maharashtra Breaking news live (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 7:42 AM IST

Updated : Jul 12, 2024, 6:32 PM IST

'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर वाचता येतील. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

6:31 PM, 12 Jul 2024 (IST)

पंकजा मुंडे, योगेश टिळेकर विजयी

भाजपाचे उमेदवार योगेश टिळेकर विजयी

भाजपाच्या पंकजा मुंडे व परिणय फूके विजयी

5:38 PM, 12 Jul 2024 (IST)

विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

एका उमेदवाराचा होणार पराभव

274 मतदारांनी केले मतदान

3:35 PM, 12 Jul 2024 (IST)

अक्षय कुमारला कोरोनाची लागण

मुंबई : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ही लागण झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे आता अक्षय कुमार अनंत अंबानी यांच्या लग्नाला मुकणार आहे.

1:32 PM, 12 Jul 2024 (IST)

शाळांजवळ उच्च कॅफीन एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश

शाळांच्या 500 मीटरच्या परिघात उच्च कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकार काढणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी राज्य विधान परिषदेत दिली.

12:35 PM, 12 Jul 2024 (IST)

पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या, नवी मुंबई पोलिसांनी सरकारला दिला धक्कादायक अहवाल

वादग्रस्त प्रशिक्षाणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका व्यक्तीला सोडण्यासाठी त्यांनी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, असे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. पोलिसांनी याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठविला आहे.

12:20 PM, 12 Jul 2024 (IST)

नायजेरियन रॅपर, टोनी ब्लेअरसह सॅमसंगचे एमडी मुंबईत दाखल, अनंत अंबानी यांच्या लग्नाला लावणार हजेरी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष जय वाय. ली काल रात्री मुंबईत आले. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी यूकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर मुंबईत आले नायजेरियन रॅपर आणि गायक-गीतकार रेमा अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी मुंबईत आली.

10:39 AM, 12 Jul 2024 (IST)

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, अनिल देशमुख यांची महायुती सरकारवर टीका

आमदार गणपत गायकवाड हे विधानपरिषद निवडणुकीत मतदान करणार असल्यानं वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार देशमुख म्हणाले, " भाजपाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यावेळीदेखील निवडणुक होती. त्यावेळी मी परवानगी मागितली होती की, मला मतदानाची परवानगी द्यावी. मात्र, कोर्टाने मला परवानगी दिली नव्हती. भाजपानं मात्र लोअर कोर्टाच्या माध्यमातून दबाव टाकून गणपत गायकवाड यांना परवानगी मागून घेतली आहे

10:31 AM, 12 Jul 2024 (IST)

मिलिंद नार्वेकर यांच्या विधानभवाच्या गेटवरच आमदारांच्या भेटीगाठी!

शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच भेट आहेत. नार्वेकर सर्व आमदारांना भेटून त्यांना विधानभवनात घेऊन जाताना दिसत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात हात घेऊन विधान भवनात पोहोचले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर देखील होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार संदीप क्षीरसागर हे मतदानासाठी गेले आहेत.

10:00 AM, 12 Jul 2024 (IST)

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये-काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्याकडं मागणी

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. गणपत गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहेत. The representation of people act मधील तरतुदी नुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही. त्यांना मतदान करायला देऊ नये, ही काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्याकडे मागणी केली आहे.

9:27 AM, 12 Jul 2024 (IST)

क्रॉस व्होटिंग झाले तर सत्ताधारी आमदारांसोबत होईल-विजय वडेट्टीवार

विधानपरिषद निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्यामध्ये कुठेही गडबड नाही. क्रॉस व्होटिंग झाले तर सत्ताधारी आमदारांसोबत होईल. आमचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, अशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

"आम्ही दोन वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आमचे मते शिंदेंना जाणार आहेत. मी घोडबाजाराच्या प्रॅक्टिसमध्ये नाही. एकनाथ शिंदे यांचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. चांगला निकाल लागणार आहे", असे आमदार बच्चु कडू यांनी सांगितलं. दिलीप वळसे पाटील म्हणाले, "महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील, अशी आम्ही आखणी केली आहे. यावेळी घोडेबाजार होईल, असे वाटत नाही. फोडाफोडीचे राजकारण करण्याची गरज नाही."

8:38 AM, 12 Jul 2024 (IST)

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाकरिता वेळ वाढवा-शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विधान भवनात दाखल झाले आहेत. शहर आणि उपनगरात पाऊस होत आहे. पावसामुळे मतदानाची वेळ वाढवावी, अशी मागणी विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी मागणी केली आहे. ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी नऊ ते चार ऐवजी एक तासाची वेळ वाढवावी, अशी मागणी करणारे पत्र दिले आहे. मात्र ही विनंती मान्य झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

7:54 AM, 12 Jul 2024 (IST)

नेपाळमधील मोठी दुर्घटना, सुमारे ६३ प्रवासी असलेल्या दोन बस नदीत वाहून गेल्या!

मध्य नेपाळमध्ये आज पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याने मोठा अपघात झाला. यावेळी दोन बस त्रिशूळी नदीत वाहून गेल्या आहेत. संततधार पावसामुळे हरवलेल्या बसचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत, असल्याचे चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी माहिती दोन बसमध्ये सुमारे ६३ प्रवासी होते. हवामानाची बदलेली परिस्थिती पाहता काठमांडूवरून चितवनला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

7:34 AM, 12 Jul 2024 (IST)

भाजपानं विधानपरिषद निवडणुकीकरिता काय आखली रणनीती?

भाजपानं आमदारांची बैठक घेत विधानपरिषदेच्या निवडणुकीकरिता रणनीती आखली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीकरिता भाजपा कोणाची मते फोडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे.

Last Updated : Jul 12, 2024, 6:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.