महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'नमो रोजगार मेळाव्या'निमित्त काका-पुतण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच मंचावर

Namo Rojgar Melava : बारामतीत आज 'नमो रोजगार मेळाव्या'चं आयोजन करण्यात आलं. यानिमित्तानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले.

नमो रोजगार मेळाव्यानिमित्त काका-पुतण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच मंचावर, बारामतीत राजकारण तापणार
नमो रोजगार मेळाव्यानिमित्त काका-पुतण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच मंचावर, बारामतीत राजकारण तापणार

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 11:38 AM IST

Updated : Mar 2, 2024, 1:36 PM IST

बारामती Namo Rojgar Melava : बारामतीत आज 'नमो रोजगार मेळाव्या'चं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं काका-पुतण्या शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. 'नमो रोजगार मेळाव्या'च्या निमित्तानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. या रोजगार मेळाव्यासह पोलीस उपमुख्यालय, बसस्थानक, पोलीस वसाहतीचं देखील उद्घाटन होणार आहे.

बसस्थानक आणि पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन : या 'नमो रोजगार मेळाव्या'बरोबरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि शरद पवार उद्घाटन करायचे. परंतु आता अजित पवार सत्तेत गेल्यानं त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलंय. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्यानं भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचं वातावरण असलं तरी या कार्यक्रमावरुन शरद पवार गटानं टीका केली होती.

शरद पवारांची लंच डिप्लोमसी : दरम्यान बारामती शहरात आज 'नमो रोजगार मेळावा' होतोय. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी त्यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी भोजनाचं खास आमंत्रण दिलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण नाकारलंय. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळं हे निमंत्रण नाकारत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. नमो महारोजगार मेळाव्यात नोकऱ्या नव्हे तर 'ट्रेनी' पदं भरणार; 'आप'चा गंभीर आरोप
  2. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण! शरद पवार यांच्या 'लंच डिप्लोमसी'मध्ये दडलंय काय?
  3. फोनवर अन् पत्राद्वारेही शरद पवार यांचं निमंत्रण! मात्र, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण नाकारलं
  4. बारामतीमधील रोजगार मेळाव्यापूर्वी शरद पवारांची गुगली, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं स्नेहभोजनाचं निमंत्रण
Last Updated : Mar 2, 2024, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details