मुंबई- महायुती सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या दोन वर्षात महायुती सरकारनं खूप काम केली असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. "पंतप्रधान मोदी देशाची प्रगती करत आहेत. राज्याच्या विकासात पंतप्रधान पाठिशी आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढं कामं केलं, तेवढं काम काँग्रेसला ५० ते ६० वर्षात करणे शक्य झाले नाही. ठाकरे गटाला काँग्रेसच्या मतांची सूज आहे. ही सूज जास्त दिवस राहणार नाही."
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "खरेतर 2 वर्षे म्हणजे खूप कमी काळ आहे. पण, महायुती सरकारनं खूप कामे केली आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाची कामे थांबली होती. ही कामे सुरू करण्यात आली. त्यांनी बंद केलेले मराठवाडा ग्रीड प्रकल्पदेखील पूर्ववत केला."
पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " मोदी सरकारच्या काळात देशाचा विकास वेगानं आहे. देशाची जगभरात प्रतिष्ठा वाढली आहे. पंतप्रधान मोदींमुळे भारताचा मान जगभरात उंचावला आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी बोलतात, तेव्हा जग ऐकते. हे फक्त पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले. त्यांनी आयुष्य सर्वस्व देशासाठी वाहून घेतलेलं आहे. एकही दिवस सुट्टी न घेणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान यांच्या प्रयत्नामुळे भारत हा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला. आपली अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर होईल, असा विश्वास आहे. भारत हा ५०० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल. पंतप्रधान मोदी हे भारत महासत्ता होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र योगदान देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्र भक्कम साथ देईल, कारण त्यांच्याकडं विकासाची दृष्टी आहे. फक्त विकास, विकास आणि विकास हेच त्यांचे ध्येय आहे. येत्या पाच वर्षात असा विकास होईल की जग पाहत राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.