महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महाराष्ट्रातील राजकारणात महिलांना दुय्यम स्थान; 'महिलाराज' फक्त नावालाच, जाणून घ्या आकडेवारी

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat)

मुंबई :राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत असून, वातावरण चांगलंच तापलंय. राज्यातील महिला नेत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी झेंडा रोवलाय. आताच्याच काळात महिला सर्व क्षेत्रात पुढं येत आहेत असं आपल्याला वाटत असेल, पण 1962 पासूनच राज्यातील राजकारणात महिला सक्रीय असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. पण, त्याचं प्रमाण खूप कमी आहे. 1962 पासून ते 2019 पर्यंत महाराष्ट्रातील राजकारणात किती महिलांनी नशीब आजमावलंय हे जाणून घेणार आहोत.

1962 पासून ते 2019 पर्यंत महिला उमेदवारांची संख्या व विजयी महिलांची संख्या

  • 1962 मध्ये 36 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 13 महिला विजयी झाल्या.
  • 1967 मध्ये 19 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 9 महिला विजयी झाल्या.
  • 1972 मध्ये 56 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 26 महिला विजयी झाल्या.
  • 1978 मध्ये 51 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 8 महिला विजयी झाल्या.
  • 1980 मध्ये 47 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 19 महिला विजयी झाल्या.
  • 1985 मध्ये 83 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 16 महिला विजयी झाल्या.
  • 1990 मध्ये 147 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ 7 महिला विजयी झाल्या.
  • 1995 मध्ये 247 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ 11 महिला विजयी झाल्या.
  • 1999 मध्ये 86 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 12 महिला विजयी झाल्या.
  • 2004 मध्ये 157 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 12 महिला विजयी झाल्या.
  • 2009 मध्ये 211 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 11 महिला विजयी झाल्या.
  • 2014 मध्ये 277 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील फक्त 20 महिला विजयी झाल्या.
  • 2019 मध्ये 239 महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील 24 महिला विजयी झाल्या.

राज्यात विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून अर्थात 1962 पासून ते 2019 पर्यंत किती महिलांनी प्रत्यक्षात निवडणूक लढवली व त्यातील किती महिला विजयी झाल्या याची सविस्तर आकडेवारी आम्ही मांडली आहे.

महिलांचा राजकारणातील सहभाग :राजकारणातील महिलांचा सक्रीय भाग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हा सहभाग दोन पातळ्यांवर बघितला जाऊ शकतो, एक म्हणजे प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडणूक लढवणे आणि दुसरं म्हणजे मतदान प्रक्रियेत सहभाग घेणं. कोणत्याही निवडणूकीतील मतदानातील टक्केवारीचं प्रमाण काढताना तरूणांप्रमाणं महिलादेखील महत्वाचा घटक समजल्या जातात.

महिला सबलीकरण गरजेचं : आज सर्वच क्षेत्रात महिला यशस्वी होत आहेत, परंतू अनेक महिला अजूनही या सगळ्या यशापासून खुप दूर आहेत. त्यासाठी आजही महिला सबलीकरणाची गरज देशाला तसंच राज्याला आहे. अनेक ठिकाणी महिलांना समाजात तसेच घरात योग्य सम्मान मिळत नाही. मोलमजूरी करून आपलं पोट भरणाऱ्या महिलांची संख्या भरपूर आहे. अनेक महिला आजदेखील शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना शिक्षण असूनसुद्धा कामाची योग्य संधी मिळत नाही.

Source : RKC and ECI

हेही वाचा

  1. विदर्भातील 23 मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर; एका विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं
  2. बडनेरा मतदारसंघात रवी राणाच 'किंगमेकर', जाणून घ्या या मतदारसंघाचा इतिहास
  3. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे सात शिलेदार रिंगणात; 'या' दिग्गजांना मिळालं तिकीट

ABOUT THE AUTHOR

...view details