मुंबई : राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीची वेगळीच रंगत पाहायला मिळत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काही पक्ष एकएकटे लढले होते. मात्र, 2024 च्या निवडणुकीत तीन - तीन पक्ष मिळून मैदानात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलंय, ते मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांकडे. मुंबईत कोण मारणार बाजी? महाविकास आघाडी की भाजपा? कोणाचे उमेदवार सर्वाधिक निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलय.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 31 जागा जिंकल्या होत्या. महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. हा निकाल सत्ताधाऱ्यांसाठी मोठा धक्का होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुंबईतील 36 पैकी 20 विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. काँग्रेसला 5 मतदारसंघातून तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला 15 मतदारसंघात आघाडी मिळाली. या निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यात शिवसेनेनं 1, भाजपानं 1 जागा, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेनं 1 आणि काँग्रेसनं 1 जागा जिंकली होती.
पक्षनिहाय कामगिरी (Source - ETV Bharat) अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तिकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात लढत झाली. या हायव्होल्टेज लढतीमध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता.
पक्षनिहाय कामगिरी (Source - ETV Bharat) 2009, 2014, 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 मतदारसंघांचा निकाल
- 2009 विधानसभा निवडणूक :भाजपा 5, काँग्रेस 17, राष्ट्रवादी काँग्रेस 3, मनसे 6, शिवसेना 4 आणि इतर 1 जागा
- 2014 विधानसभा निवडणूक :भाजपा 15, काँग्रेस 5, शिवसेना 14 आणि इतर 2 जागा
- 2019 विधानसभा निवडणूक : भाजपा 16, काँग्रेसनं 4, राष्ट्रवादी 1, शिवसेना 14 आणि इतर 1 जागा
हेही वाचा
- खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलिसात तक्रार दाखल
- मनसेची साथ सोडवेना; भाजपाची राज ठाकरेंशी मैत्री म्हणजे शिंदेंसाठी 'धोक्याची' घंटा
- अमित ठाकरेंचा दारोदारी जाऊन प्रचार सुरू, पण सदा सरवणकरही निवडणूक लढवण्यावर ठाम