मुंबई - अभिनेता सलमान खान यानं त्याचे वडील सलीम खान यांच्या पहिल्या बाईकची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. रुबाबदार 'ट्रायम्फ टायगर 100,1956' ची झलक दाखवून सलमाननं आपल्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक बनवलं आहे.
गुरुवारी सलमाननं त्याच्या वडिलांबरोबरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, "वडिलांची पहिली बाईक, ट्रायम्फ टायगर 100,1956." यातील एका फोटोत सलीम खान गाडीवर बसलेले दिसत आहेत. तर सलमान त्यांच्या शेजारी उभा आहे. दुसऱ्या फोटोत सलमान ट्रायम्फ टायगर 100 बाईकची सवारी करताना दिसत आहे. सलमाननं ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटिझन्सनी त्याच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि कमेंटसह हृदय असलेल्या इमोजींचा भडीमार केला.
दरम्यान, सलमान खान करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बीवी नंबर 1' हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. गुरुवारी या चित्रपटाचा निर्माता वाशू भगनानी यांनी तब्बू, सुष्मिता सेन आणि अनिल कपूर यांनी अभिनय केलेल्या हिट चित्रपटाच्या पुन्हा रिलीज तारखेचा खुलासा करून अपडेट शेअर केलं होतं. हा चित्रपट पहिल्यांदा 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता तो 29 नोव्हेंबरला थिएटरमध्ये परतणार आहे.
'बीवी नंबर 1' चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता आणि 1999 मध्ये बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. 'चुनरी चुनरी', 'इश्क सोना' आणि 'मुझे माफ करना' यासारख्या हिट गाण्यांसह अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेला या चित्रपटाचा साउंडट्रॅक प्रचंड लोकप्रिय झाला होता.या चित्रपटात सैफ अली खान एका खास कॅमिओमध्ये दिसला होता.
दरम्यान, कामाच्या आघाडीवर सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' या भरपूर अॅक्शन असलेल्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित आणि ए.आर. मुरुगदास, हा चित्रपट 2025 च्या ईदला रिलीज करण्याची तयारी सुरू झाली आहे. सलमान खान पुन्हा एकदा धमाकेदार अॅक्शनमध्ये त्याचे तमाम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमान अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. 'किक', 'जुडवा' आणि 'मुझसे शादी करोगी' या आधीच्या यशस्वी चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला ही जोडी 'सिकंदर'च्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली आहे. याशिवाय सलमानकडे 'किक 2' आणि आदित्य चोप्राचा 'टायगर वर्सेस पठान' हे दोन चित्रपटही आहेत. सध्या सलमान खान 'बिग बॉस' 18 हा टीव्ही शो होस्ट करत आहे.