ETV Bharat / politics

अपक्ष उमेदवारांना महायुतीकडून ५० ते १०० कोटींची ऑफर- संजय राऊत यांचा आरोप - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

महाराष्ट्रात पुन्हा 'महायुती' सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज विविध 'एक्झिट पोल'मधून वर्तवण्यात आलाय. यावरच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut criticism over Maharashtra Assembly Election Result Exit Poll Prediction
संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2024, 1:45 PM IST

मुंबई : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. मतदानानंतर आता राज्यात महाविकास आघाडी की महायुतीची सत्ता येणार? याबाबतचा अंदाज विविध एक्झिट पोलकडून वर्तवण्यात आलाय. बहुतांश एक्झिट पोलनं विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक्झिट पोलचे आकडे आणि शक्यता फेटाळल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : यासंदर्भात मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, "प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलंय की, आम्ही किमान 160 जागा जिंकू. त्यामुळं जे सर्व्हे येताय, त्या सर्व्हेंची ऐसी की तैसी! सत्ता असलेल्या ठिकाणी इतर छोटे-मोठे पक्ष एकत्र येतात. यासाठी शेतकरी पक्ष, समाजवादी पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष, हे सर्व छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिंकण्याची खात्री नसल्यानं त्यांनी उमेदवारांना 50 ते 100 कोटी रुपयांची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे", असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

लाडक्या बहिणींचं गुलामगिरी विरुद्ध बंड : मतदानात वाढलेल्या आकडेवारीवरुन संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "मतदानाच्या आकडेवारीमध्ये अचानक वाढ कशी होते? हरियाणात सुद्धा तेच झालं. अचानक दोन-चार टक्के मतदान आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा कशा काय वाढतात? हा काय खेळ आहे? हे निवडणूक आयोगानं आम्हाला समजावून सांगायला हवं," असं राऊत म्हणाले. यंदा महिला मतदारांचा आकडाही वाढला आहे. यावरुन लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "लाडक्या बहिणींनी केवळ तुम्हालाच मतदान केलं का? 1500 रुपये देऊन आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही, असं महिलांना वाटलं. त्यामुळे त्यांनी या गुलामगिरी विरुद्ध बंड करून जास्त मतदान केलंय", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकरांविषयी काय म्हणाले? : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता येणाऱ्यांबरोबर राहणार असल्याचं सांगितलंय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे 50-60 आमदार यंदा निवडून येत असतील. जर आम्हाला 50-60 आमदारांची गरज लागली, तर आम्ही नक्कीच त्यांची मदत घेऊ. राज्यात आमची सत्ता येत असल्यानं प्रकाश आंबेडकर आमच्या सोबतच राहतील", असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; 'एक्झिट पोल'नुसार स्पष्ट बहुमत, MVA नं दिली 'टाईट फाईट'
  2. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, मुख्यमंत्री पदाबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले...
  3. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल; नाना पटोले यांना विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.