रत्नागिरी-सिंधुदुर्ग Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात मतमोजणी झाली. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाकडं (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024) अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane Win) यांचा विजय झालाय. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा पराभव केला आहे. विजयानंतर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जल्लोष साजरा केला.
शिवसेनेचा बालेकिल्ला : रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवलेले नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा १.७८ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत निलेश राणे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, तेव्हा राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवून जिंकवून दाखवली आहे.
नितेश राणे यांनी केला जल्लोष :चौदाव्या फेरी अखेर नारायण राणे यांना 2 लाख 67 हजार 690 इतकी मतं मिळाली. तर विनायक राऊत यांना 2 लाख 40 हजार 431 इतकी मतं पडली होती. त्यामुळं नारायण राणे यांनी तब्बल 27 हजार 259 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळं त्याचवेळी वडिलांनी आघाडी घेताच आमदार नितेश राणे यांनी जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेरच आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय. यावेळी त्यांच्या आई देखील सोबत होत्या. नारायण राणे यांच्या विजयानंतर नितेश राणे यांनी आईला मिठी मारली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल