महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024

Lok Sabha Election : भाजपाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिहिर कोटेचा यांना एका धार्मिक कार्यक्रमात मतदान करण्याचं आवाहन करण्यात आल्यानं मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धार्मिक कार्यक्रमात भाजपाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचांना मतदान करण्याचं आवाहन
धार्मिक कार्यक्रमात भाजपाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचांना मतदान करण्याचं आवाहन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 3:37 PM IST

मुंबई Lok Sabha Election : मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक कार्यक्रमात भाजपाचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उत्तर भारतीय स्नेह मिलन कार्यक्रमात भाजपा उमेदवाराचा प्रचार : मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्तर भारतीय स्नेह मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. याप्रकरणी आयोजक सुनिल पाल यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या कार्यक्रमाला निवडणूक आयोगाची परवानगी नसल्याचं देखील निष्पन्न झालय. मानखुर्द परिसरातील जनतानगर इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकरणी सिकंदर मुलाणी यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार सिकंदर मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापालिकेत काम करणारे सिकंदर यांची 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ विभागामध्ये भरारी पथकात नियुक्ती करण्यात आलीय. ते आपल्या पथकासह मानखुर्द हद्दीत नेमून दिलेल्या परिसरामध्ये फिरुन आचारसंहिता भंग केलेल्या तक्रारींबाबत शहानिशा करुन पुढील योग्य ती कारवाई करण्याचं काम करतात.

चौकशी करुन कारवाईचे आदेश : यादरम्यान मानखुर्द विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्री संकट मोचन हनुमान मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत विनापरवाना भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारार्थ लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत आवाहन केलं आणि आदर्श आचारसंहितेचा भंग केलाचं आढळून आल्यानं अर्जदार यांनी सिकंदर मुलाणी यांच्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला. तो अर्ज निवडणूक कार्यालयाकडं प्राप्त झाला असून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं चौकशी करुन पुढील कारवाई करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. त्यावरुन या घटनेची शहानिशा करुन सविस्तर चौकशी केल्यानंतर यूट्यूब चैनलवरील एका व्हिडिओमध्ये मिहिर कोटेचा यांचा प्रचार केल्याचं दिसून आलं.

मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : या कार्यक्रमासाठी 200 महिला आणि पुरुष लोकांचा जनसमुदाय जमलेला दिसून येतोय. 6 मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास संकटमोचन मंदिरासमोर मोकळ्या जागेत हा कार्यक्रम सुनील पाल यांनी आयोजित केला होता. विनापरवाना धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करुन धार्मिक कार्यक्रमांमध्ये निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी न घेता आचारसंहिता चालू असताना भाजपा या राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार मिहिर कोटेचा यांचा प्रचार केल्याचं दिसून आल्यानं मानखुर्द पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. "पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण निवडणुकीसाठी ...", हितेंद्र ठाकूर यांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप - Hitendra Thakur
  2. "...हे शहाणपणाचं लक्षण नाही", शरद पवारांची जोरदार पंतप्रधान मोदींवर टीका - Sharad Pawar

ABOUT THE AUTHOR

...view details