काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले, "हा एक्झिट पोल नाही. हा मोदींचा मीडिया पोल आहे. हा त्यांचा फँटसी पोल आहे." इंडिया आघाडीच्या संख्येबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही सिद्धू मूसवालाचे 295 गाणे ऐकले आहे का? " इंडिया आघाडीला किमान 295 जागा मिळतील, असा त्यांनी अप्रत्यक्षपणे विश्वास व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोण मारेल बाजी, काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? - lok sabha 2024 exit poll
Published : Jun 2, 2024, 10:59 AM IST
|Updated : Jun 2, 2024, 1:24 PM IST
LIVE FEED
हा एक्झिट पोल नाही, मोदींचा मीडिया पोल- राहुल गांधी
महाराष्ट्रात आम्हाला 35 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत-विजय वड्डेटीवार
काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार एक्झिट पोलवर म्हणाले, " 4 जूनला इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. एक्झिट पोल हे सर्व सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी केले जात आहेत. 4 जूनला सत्य बाहेर येईल. आम्ही सत्तेत येणार असून महाराष्ट्रात आम्हाला 35 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत."
एक्झिट पोल मॅनेज करण्यात आले- जयराम रमेश यांचा आरोप
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली. जयराम रमेश म्हणाले, " 4 जूनला पंतप्रधानांना निश्चितपणे निघून जावे लागेल. एक्झिट पोल मॅनेज केलेले आहेत. एक्झिट पोल आणि 4 जूनच्या निकालांमध्ये खूप फरक असणार आहे. इंडिया आघाडीला 295 च्या खाली जागा मिळणे अशक्य आहे."
पंतप्रधान रोजगारावर नव्हे मंगळसुत्रासह मजुरावर बोलले- खासदार मनोज झा यांची टीका
आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले, पंतप्रधान रोजगारावर बोलले नाहीत. पंतप्रधान सामाजिक-आर्थिक न्यायावर बोलले नाहीत. म्हैस, मंगळसूत्र, मुजरा यावर पंतप्रधान बोलले आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर मला वाटते की लोकशाहीची स्थिती चांगली राहणार नाही."
एक्झिट पोल हा कॉर्पोरेट खेळ, पोल नसून फ्रॉड-संजय राऊत
इंडिया आघाडीला २९५हून जास्त जागा मिळणार आहेत. एक्झिट पोल हा कॉर्पोरेट खेळ आहे. हा पोल नसून फ्रॉड आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
भाजपा सत्तेत आल्यास श्रीमंतांनाच फक्त फायदा होणार-तेलंगणा काँग्रेसचे नेते हनुमंता राव
एक्झिट पोलवर तेलंगणा काँग्रेसचे नेते व्ही हनुमंता राव म्हणाले, " राहुल गांधी हे गरीबांबद्दल बोलतात. तर भाजपा सत्तेत आल्यास श्रीमंतांनाच फक्त फायदा होणार आहे. जर एक्झिट पोलचे अंदाज चुकून काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल. राहुल गांधी पंतप्रधान होतील."