महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी कराड दक्षिणच्या जनतेचं मतदान; पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

सातारा जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कराडमध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं. तर साताऱ्यात उदयनराजेंनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 7:01 PM IST

Updated : Nov 20, 2024, 7:14 PM IST

सातारा: कराड दक्षिणचे मतदार महाराष्ट्रात सत्ता बदल करण्यासाठी मतदान करत असल्याचं वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. दरम्यान, गेली साठ वर्षे शरद पवार आणि काँग्रेसनं केवळ घोषणा करून लोकांच्या भावनांशी खेळ केला. याच्यापेक्षा मोठी गद्दारी असू शकत नाही, अशी टीका उदयनराजेंनी केली.



सत्ता बदलानंतर राज्य सुरळीत चालेल : काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरपालिका शाळा क्र. ३ मध्ये सहकुटुंब मतदान केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मतदार सत्ता बदल करण्यासाठी मतदान करत आहेत. सत्ताबदल झाल्यानंतर राज्य सुरळीत चालेल. गेली दहा वर्षे वाया गेली. बरंच काही सुधारायचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर राज्याची अर्थिक परिस्थिती सुधारेल".

प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण (ETV Bharat Reporter)


राज्यात मविआला बहुमत निश्चित : "राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, हे निश्चित असल्याचा ठाम विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आत्ताच जागांचा निश्चित आकडा सांगता येत नाही. परंतु, बहुमताबद्दल आत्ता तरी अडचण वाटत नाही, असं सांगत त्यांनी राज्यात सत्ताबदल होणारच, असं ठामपणे सांगितलं".



'सत्ता' टिकवण्यासाठी सत्तेचा गैरवापर: "अनिल देशमुखांवर हल्ला, विनोद तावडे पैसे वाटताना सापडले, अशा अनेक गोष्टी घडत आहेत. हिंदुत्वाचं वातावरण करून अल्पसंख्यकांबद्दल द्वेष निर्माण करणं, धर्मामध्ये तेढ निर्माण करून त्यातून मतं मिळवायचा प्रयत्न सुरू आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी पैशाचा प्रचंड वापर आणि सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला".


अंतर्गत वादातून तावडेंची टिप : नालासोपारा येथील घटनेवर प्रतिक्रिया देताना, पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत वादातून तावडेंची टिप दिल्याचं उघड झालं असल्याचं सांगितलं. महायुतीचा पराभव झाला तर तावडेंमुळं झाला आणि बहुमत झालं तर तावडे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून बाहेर असावेत", असं काही लोक प्रयत्न करत असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.



साठ वर्षे फक्त घोषणाच केल्या : गेली साठ वर्षे शरद पवार आणि काँग्रेसनं फक्त घोषणाच केल्या. लोकांची कामं केलीच नाहीत. लोकांच्या भावनांशी खेळले. याच्यापेक्षा मोठी गद्दारी होवू शकत नाही, अशी बोचरी टीका उदयनराजेंनी केली. तसंच विनोद तावडे यांचं चारित्रहनन करण्यासाठी जाणीवपूर्वक कारस्थान रचलं गेलं. रुममध्ये बसले असताना पैशाची बॅग ठेवून फोटो काढायचे, हे सगळं नियोजित होतं, असा आरोपही उदयनराजेंनी केला.

हेही वाचा -

  1. गाडीत विदेशी मद्य अन् पैशांची पाकिटे सापडल्याप्रकरणी केदार दिघेंसह 8 जणांविरोधात गुन्हा, आता केदार दिघे म्हणतात...
  2. बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप, काँग्रेससह सुप्रिया सुळेंची माजी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात सायबर क्राईमकडं तक्रार
  3. मतदान सक्ती कायदा करण्याची गरज, रामदास आठवले संसदेत आवाज उठवणार
Last Updated : Nov 20, 2024, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details