पुणे : शनिवारी बीडमध्ये झालेल्या हत्याकांड विरोधात मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी यात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं व्हॉट्सअँप चॅट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्हायरल करत त्यांच्यावर आरोप केला होता. या प्रकरणी बीडमध्ये रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी घाबरणार नाही : "माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला गुन्हा हा खोटा आहे. एफआयआरमध्ये ज्यांच्याबद्दल बदनामी झालं असं म्हणतात त्यांचं नावच नाही. जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मी घाबरणार नाही तर मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे". अशी प्रतिक्रिया रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची बदनामी केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात बीडमध्ये तक्रार दाखल केली आहे.
प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे (ETV Bharat Reporter) काय आहे घटना? : केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर अनेक आरोप केले जात आहेत. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शनिवारी बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. अजूनही या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे. बीडमधील आक्रोश मोर्चात जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले होते.
व्हॉट्सअप चार्ट व्हायरल : बीडमधील मोर्चात जितेंद्र आव्हाड यांचे काही व्हॉट्सअप चार्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होताना त्यांना दिसले. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड त्या चार्टमध्ये दिसत होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. आता याबद्दल मोठी माहिती पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझे काल भाषण संपले आणि त्यानंतर व्हॉट्सअप चार्ट व्हायरल झाले. मी वापरत असलेला फोन आणि चार्टवरील सिग्नल वेगळे आहे. माझा डिपीतील फोटो देखील चुकीचा आहे.
हेही वाचा -
- डोंबिवलीचे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात प्रदेश अध्यक्ष पदाची माळ! 'वाचा' चव्हाणांचा राजकीय प्रवास
- उज्ज्वल निकम लढणार कल्याणमधील निर्भया प्रकरण, ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- बीड सरपंच हत्या प्रकरणात राजकीय वातावरण तापलं, सुरेश धस आणि वाघमारे यांनी केली टीका