महाराष्ट्र

maharashtra

गीता गवळी ठाकरेंच्या सेनेत जाणार? मिलिंद नार्वेकरांच्या भेटीनं चर्चांना उधाण - Uddhav Thackeray shivsena

Gita Gawli : अखिल भारतीय सेना या पक्षाच्या नेत्या गीता गवळी या शिवसेना (ठाकरे गटाच्या) संपर्कात असून, त्या लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी गीता गवळी यांची भेट घेतली. गीता गवळी यांच्या भायखळा येथील दगडी चाळ या निवासस्थानी मिलिंद नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Published : 4 hours ago

Milind Narvekar and Geeta Gawli
मिलिंद नार्वेकर आणि गीता गवळी (Etv Bharat File Photo)

मुंबईGita Gawli - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम-गयाराम यांना ऊत येण्याची शक्यता आहे. तिकीट नाकारल्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी आणि रणनीती आखली जात असताना दुसरीकडे नाराज बंडखोरीच्या तयारीत असल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसताहेत. दरम्यान, अखिल भारतीय सेना या पक्षाच्या नेत्या गीता गवळी या शिवसेना (ठाकरे गटाच्या) संपर्कात असून, त्या लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.

गीता गवळींच्या भेटीमुळं चर्चांना उधाण : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी गीता गवळी यांची भेट घेतली. गीता गवळी यांच्या भायखळा येथील दगडी चाळ या निवासस्थानी मिलिंद नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गीता गवळी यांच्या आईदेखील उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान नार्वेकर आणि गीता गवळी यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. या भेटीनंतर गीता गवळी ह्या ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत का? किंवा ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत का? यावर तर्कवितर्क लावले जाताहेत. दुसरीकडे गीता गवळी यांचा अखिल भारतीय सेना हा पक्ष ठाकरे गटासोबत युती करेल किंवा ठाकरे गटाचा पाठिंबा घेईल, अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

भायखळा मतदारसंघातून इच्छुक : दुसरीकडे गीता गवळी यांनी 2019 रोजी भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तिथे शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा विजय झाला होता, तर गीता गवळी या चौथ्या नंबरवर राहिल्या होत्या. तसेच भायखळा मतदारसंघातून 2014 रोजी एमआयएमचे वारीस पठाण यांचा विजय झाला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाले आहे. ठाकरे गटाचे अजूनही मुंबईत वर्चस्व आहे. त्यामुळे गीता गवळी या भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. जर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तर शिवसेना (शिंदे) यामिनी जाधव आणि गीता गवळी अशी थेट लढत होणार असल्याचं बोललं जातंय.

पक्षात येत असल्यास आमची मान्यताच: विशेष म्हणजे या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी बाकीचे सगळे सोडून गेले, तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंतच राहिले आणि आता जे जे म्हणून पक्षात येतील किंवा उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील ते आम्हाला मान्य आहे. शेवटी मिलिंद नार्वेकर गीता गवळी यांना भेटायला गेले असल्यास त्याचे नेमके कारण माहीत नाही. पण जर गीता गवळी या आमच्या पक्षात येत असतील तर त्याला आमची मान्यताच आहे. शेवटी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं गीता गवळी यांच्या पक्षप्रवेशावर किशोरी पेडणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details