ETV Bharat / entertainment

अरेंज्ड मॅरेज परंपरेत 'स्थळ' आल्यानंतर मुली काय विचार करतात? शांतपणे विचार करा आणि पाहा 'स्थळ' !! - MARATHI FILM STHAL

लग्न परंपरेवर भाष्य करणारा 'स्थळ' हा चित्रपट येत्या 7 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी रिलीज होतोय.

Marathi film 'Sthal'
स्थळ चित्रपट (Sthal teaser screen grab)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 18, 2025, 2:09 PM IST

मुंबई - ग्रामीण भागात आजही मुलींच्या मनाचा विचार न घेता लग्न ठरवण्याची पद्धत आहे. जेव्हा मुलीचं स्थळ पाहण्यासाठी पाहुणे मंडळी येतात तेव्हा त्यांच्या प्रश्नातून ते स्त्री बद्दलची माहिती विचारत नाहीत तर एखाद्या विक्रीसाठीच्या वस्तुचा भाव मोल करत असल्याचं दिसतं. याच संवेदनशील विषयावरील 'स्थळ' हा चित्रपट येत्या 7 मार्च रोजी प्रदर्शित होत

स्त्री सशक्तीकरण म्हणजे स्त्रीला अशी शक्ती प्रदान करणं जेणे करुन ती तिच्या आयुष्यामध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय खंबीरपणे घेऊ शकेल. हे शिकवायला किती जरी आवश्यक आणि महत्त्वाचं असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणणं हे खूप कठीण आहे. याचा प्रत्यय भारतातील स्त्रीया अनंत काळापासून घेत आल्या आहेत. याच विषयावरचा 'स्थळ' हा चित्रपट समाजातातील लग्नासाठी स्थळ शोधण्याबाबत डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

४८ व्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'स्थळ' या चित्रपटानं प्रतिष्ठित NETPAC पुरस्कार मिळवला होता. हा पुरस्कार दरवर्षी नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा द्वारे TIFF मध्ये प्रीमियर होणाऱ्या आशियातील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. आता हा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं 7 मार्च रोजी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सचिन पिळगावकर यांनी प्रेझेन्ट केलेला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे.

ग्रामीण भागात मुलीचं स्थळ पाहताना दिसणाऱ्या दृष्यापासून 'स्थळ'च्या ट्रेलरची सुरुवात होते. त्या मुलीच्या मनाचा विचार न घेता तिच्यावर हे लग्न लादण्याचा प्रयत्न कसा होतो याचं उत्तम चित्रण यात पाहायला मिळणार आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नवोदित कलाकारांनी यामध्ये अतिशय वास्तववादी आणि सहज भूमिका साकारल्या आहेत. यंदाच्या महिला दिनी हा एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.