सातारा EVM Machine: ईव्हीएम मशिनबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करता येत असल्यानं लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हटाव कृती समितीच्या वतीनं साताऱ्यात मंगळवारी माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्राची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना लक्ष्मण माने यांनी 'ईव्हीएम हटाव, देश बचाव'चा नारा दिला.
मोदी सरकारकडून दहा वर्षे मतांची चोरी: राजवाडा येथून मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, कोणतेही बटण दाबले की, मत कमळाला जाते, त्यामुळं हे 'ईव्हीएम' मशीन बोगस असून ते हॅक होत असल्याचं सिद्ध करून दाखवण्यात आलं आहे. या यंत्राच्या माध्यमातून मोदी सरकार गेली १० वर्षे जनतेच्या मतांची चोरी करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या : जनतेचा आता मतदान यंत्रावर विश्वास राहिलेला नाही. कारण, १८ लाख ९४ हजार मशीन गायब आहेत. तर १७ लाख ६ हजार मशीन खराब आहेत. या गायब आणि खराब मशीनबाबत निवडणूक आयोगही बोलत नाही, असं सांगत 'ईव्हीएम हटाव, देश बचाव'चा नारा लक्ष्मण माने यांनी दिलाय. आगामी निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी त्यांनी केलीय.
अनेक पक्ष, संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा : मतदान यंत्रांची अंत्ययात्रा काढून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी साताऱ्याती परिवर्तनवादी संघटनांनी केली. त्याला राष्ट्रीय काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला. तर ईव्हीएम हटाव आंदोलन शांततेत पार पडले.
हेही वाचा -
- मोदी विष्णूचे 13 वे अवतार असतील तर मग बॅलेट पेपरला का घाबरता?, संजय राऊतांचा हल्लाबोल
- हिमाचल विधानसभा निवडणूक संपताच खासगी वाहनात सापडले ईव्हीएम मशीन
- Sharad Pawar On EVM : ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास मत नेहमीच भाजपला जाते, विरोधकांनी 'हे' उपस्थित केले प्रश्न