महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारची महिलांना खैरात; 25 लाख महिलांना करणार साडी वाटप - महिलांना मोफत साडी

Free Saree Scheme : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारनेही महिलांना साद घालण्याचा प्रयत्न केलाय. राज्यातील अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या गरीब महिलांना साडी वाटप करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सुमारे 25 लाख महिलांना साडी वाटप केलं जाणार आहे.

Saree on Ration Card
25 लाख महिलांना साडी वाटप

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 3:30 PM IST

मुंबईFree Saree Scheme : मध्य प्रदेश येथील शिवराज सिंह चौहान सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी 'लाडली बहन योजना' राबवली होती. या योजनेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं महिलांच्या खात्यामध्ये दरमहा काही रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश सरकारच्या या निर्णयाचा त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. त्यामुळं आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही महिलांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. साडी ही महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळं राज्यातील महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी राज्य सरकारनं अंत्योदय योजनेचा (Antyodaya Yojana) लाभ घेणाऱ्या गरीब महिलांना मोफत साडी वाटप करण्याचा निर्णय घेतलाय.



काय आहे निर्णय: राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत 'कॅपिटल मार्केट योजने'अंतर्गत राज्यातील अत्यंत गरीब असलेल्या अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. या अंतर्गत राज्यातील 24 लाख 80 हजार 384 महिलांना साडी वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे वित्त सल्लागार आणि महालेखाधिकारी विजय पुजारी यांनी दिलीय.



योजनेचा उद्देश :या संदर्भात बोलताना विजय पुजारी यांनी सांगितलं की, राज्यातील गरीब महिलांना राज्य सरकारच्या वतीनं वस्त्र म्हणून साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार राज्यातील यंत्रमाग व्यवसायालाही चालना मिळावी आणि गरीब महिलांनाही मदत व्हावी हा राज्य शासनाचा उद्देश आहे. यापैकी एक साडी ही ३५५ रुपये आणि पाच टक्के जीएसटी या किंमतीची असणार आहे. आर्ट सिल्क असं या साडीचं नाव असून 26 जानेवारी 2024 पासून या साडीचं वितरण राज्यभरात सुरू करण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या साडीचं राज्यातील सुमारे 25 लाख महिलांपर्यंत वितरण झालेलं असेल.

जिल्हा निहाय लाभार्थींची संख्या : मुंबई 4452, ठाणे 59,505, पालघर 98 हजार 68, रत्नागिरी 38 हजार 730, नागपूर एक लाख 26 हजार 489, अमरावती एक लाख 27 हजार 465, अकोला 42 हजार 310, नांदेड 79 हजार 111, बीड 3886, छत्रपती संभाजीनगर 66 हजार 492, अहमदनगर 88 हजार 37, परभणी 44 हजार 469, जळगाव एक लाख 34 हजार 926 आणि नाशिक एक लाख 76 हजार 552 इतकी लाभार्थी संख्या असल्याचं पुजारी यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. संसदेत गदारोळ करणाऱ्यांसाठी हे अधिवेशन पश्चतापाची शेवटची संधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
  2. कर्नाटकातील 11 जिल्ह्यात लोकायुक्तांची छापेमारी; बेहिशेबी मालमत्ता जमवणाऱ्या अधिकाऱ्यांचं धाबे दणाणलं
  3. हेमंत सोरेन यांची आज ईडीकडून होणार चौकशी, अटक झाली तर कोण होणार मुख्यमंत्री?

ABOUT THE AUTHOR

...view details